Apple Watch Ultra सारखी ही वॉच मिळेल जबरदस्त फिचरसह एकदम स्वस्तात, किंमत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Watch Ultra

Apple Watch Ultra सारखी ही वॉच मिळेल जबरदस्त फिचरसह एकदम स्वस्तात, किंमत...

Apple Watch Ultra ही प्रत्येकाची पहिली पसंती आहे. पण काही वेळा खर्चामुळे तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागतो. आज आम्‍ही तुम्‍हाला अशी एक पद्धत सांगणार आहोत, जिच्‍या मदतीने तुम्‍ही अशाच प्रकारचे स्‍मार्टवॉच अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. Apple Watch Ultra ची MRP 89,900 रुपये आहे आणि सध्या त्यावर कोणतीही सूट नाही, त्यामुळे तुम्हाला ते तेवढ्याच किंमतीत खरेदी करावे लागेल. पण फायर बोल्टने अशा वापरकर्त्यांसाठी नवीन घड्याळ आणले आहे.

तुम्ही फायर बोल्ट ग्लॅडिएटर ऑनलाइन सहज खरेदी करू शकता. ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 3,999 रुपये खर्च करावे लागतील. फायर बोल्ट स्मार्टवॉचची एमआरपी 9,999 रुपये आहे, परंतु सध्या खूप मोठी सूट सुरू आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही ते फक्त Rs.3,999 मध्ये खरेदी करू शकता. ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

वैशिष्ट्यांपेक्षा हे घड्याळ त्याच्या डिझाईनमुळे चर्चेत आहे. या घड्याळाची रचना अगदी वेगळी आहे. आणि हे वॉच अगदी Apple Watch Ultra सारखे म्हणता येईल. कारण त्याची रचनाच वेगळी आहे. या घड्याळाची सर्वाधिक विक्री होण्यामागेही हेच कारण आहे. फायर बोल्ट ग्लॅडिएटरमध्ये 1.96 इंचाचा एचडी मोठा डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा पर्यायही देण्यात आला आहे.

हेही वाचा: Pebble Watch: अवघ्या ४ हजारात Apple Watch Ultra सारखे घड्याळ, कॉलिंगचाही सपोर्ट; पाहा फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यूजर्सच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेतली आहे. याच कारणामुळे तुम्हाला यामध्ये 123 स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आले आहेत. यासोबतच यामध्ये व्हॉईस असिस्टंट देखील उपलब्ध आहे. सुपर रेटिना असलेल्या या घड्याळात लक्झरी व्ह्यूही देण्यात आला आहे. घड्याळात 500Nits पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. यामध्ये, कमांड पूर्णपणे हातात ठेवता येते कारण ते कॉलिंगसाठी विशेष मोड देते. (Electronic Gadget)