IBM Simon : आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी आला होता जगातील पहिला स्मार्टफोन, फीचर्स होते भन्नाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IBM Simon

IBM Simon : आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी आला होता जगातील पहिला स्मार्टफोन, फीचर्स होते भन्नाट

IBM Simon Smart Phone History : आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. लहान असो अथवा वृद्ध... प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी २४ तास कनेक्ट राहण्यासाठी स्मार्टफोन गरजेचा झाला आहे. अगदी खिश्याला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असल्याने कोणीही सहज स्मार्टफोन खरेदी करत आहे. परंतु, जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन कोणता होता माहितीये? जवळपास २९ वर्षांपूर्वी जगातील पहिला स्मार्टफोन बनवण्यात आला होता. या पहिल्या वहिल्या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Smartphone : भारतातील सर्वांत स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च; किंमत फक्त....

जगातील पहिला वहिला स्मार्टफोन बनविण्याचे श्रेय टेक कंपनी IBM ला दिले जाते. कंपनीने या फोनला सिमोन असे नाव दिले होते. वर्ष १९९४ मध्ये या फोनची विक्री सुरू झाली होती. विशेष म्हणजे या फोनमध्ये टचस्क्रीन, ईमेल पाठविण्याची सुविधा यासह कॅलक्यूलेटर आणि स्केच पॅड सारखे अनेक अॅप्स उपलब्ध होते. या स्मार्टफोनमध्ये काही त्रुटी देखील होत्या. या फोनची बॅटरी लाईफ केवळ १ तास होती.

हेही वाचा: Redmi Sale : जुने स्मार्टफोन मिळत आहेत स्वस्त; ही आहे खास ऑफर

अवघ्या ६ महिनेच आयबीएमचा हा फोन बाजारात उपलब्ध होता. या दरम्यान याच्या ५० हजार यूनिट्सची विक्री झाली. लांबलचक, वॉकी-टॉकी सारखा दिसणारा हा फोन आपल्या हटके फीचरमुळे लाँचनंतर विशेष चर्चेत होता. लाँचनंतर या फोनची किंमत तब्बल ११०० डॉलर्स एवढी होती.

हेही वाचा: Smart Phone : आला रे आला! अवघ्या 9 मिनिटात फुल्ल चार्ज होणार स्मार्टफोन

सतत बदलणाऱ्या टेक्नोलॉजीमुळे सिमॉन मागे पडत गेला, असे म्हणता येईल. ९० च्या दशकात आलेले फ्लिप फोन, यासोबतच नोकियाचा दबदबा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह येणारे लेटेस्ट स्मार्टफोन यामुळे सिमॉन मागे पडला. गेल्या दोन दशकात सॅमसंग, अॅपल आणि ह्युई सारख्या कंपन्यांचा देखील स्मार्टफोन बाजारात दबदबा पाहायला मिळत आहे. दरवर्षी स्मार्टफोन यूजर्सची संख्यादेखील झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, IBM ने लाँच केलेल्या पहिल्या वहिल्या स्मार्टफोनने इतर कंपन्यांना प्रेरणा दिली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.