Rocket : खासगी कंपनीने तयार केलेले पहिले भारतीय रॉकेट घेणार भरारी

हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे कारण देशातील रॉकेट क्षेत्र आतापर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या ताब्यात होत.
Rocket
Rocketgoogle

मुंबई : भारतात स्पेस रॉकेट म्हटल की पहिलं नी महत्वाच नाव येत ते विक्रम साराभाई. भारतातील एका खासगी कंपनीने तयार केलेल पहीलं रॉकेट लवकरच उड्डाण घेईल. त्याच नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आल आहे (विक्रम-एस).

स्कायरूट एरोस्पेस हे त्या खाजगी कंपनीच नाव आहे. स्कायरूट एरोस्पेस 2018 ला स्थापन हैदराबाद येथील खाजगी स्पेस स्टार्टअप आहे. ISRO मध्ये काम केलेले माजी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची टिम स्कायरूट साठी काम करते. त्यांच्या 'प्रारंभ' मिशनचा एक भाग म्हणून विक्रम-एस, भारतातील पहिले खासगीरित्या विकसित रॉकेट या 12 ते 16 तारखे दरम्यान अंतराळात प्रक्षेपित होईल.

हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे कारण देशातील रॉकेट क्षेत्र आतापर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या ताब्यात होत. हे क्षेत्र आता भारताच्या तरुणाईला खुल झालय. स्कायरूट एरोस्पेस म्हणत की “आम्ही आजच्या तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडून सर्वांसाठी स्पेस खुलं करण्याच्या मोहिमेवर आहोत.

आम्ही अशा भविष्याच्या दिशेने काम करत आहोत जिथे स्पेस आपल्या जीवनाचा एक भाग बनेल. अमेरीकेतल्या SPACE-X या एलन च्या रॉकेट पाठवणाऱ्या खाजगी कंपनीने मोठा पैसा कमावला आणि प्रसिध्दी सुध्या. स्कायरूट एरोस्पेस कडुन आपण आत्ताच इतक्या अपेक्षा करायला नकोत.

पण हे सर्वांनाच माहित आहे की हे खाजगी क्षेत्रात चांगला पैसा कमाऊन देते.परदेशाचे उपग्रह जेव्हा आपण आकाशात सोडतो तेव्हा भारतात बक्कळ FOREX RESERVE कमावतो. त्यामुळे भारताच्या स्पेस विकासासाठी एक मोठ पाऊल ठरेल.

विक्रम साराभाई यांच नाव या रॉकेट ला दिलय कारण यांनी भारताला स्पेस रॉकेट च स्वप्न दाखवल. आत्ता आपण विक्रम साराभाई यांनी भारत स्पेस प्रोग्रामसाठी काय केल ते बघु.

विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 ला अहमदाबाद गुजरात येथे झाला. त्यांच्या जन्म एका समृद्ध परिवारात झाला होता. त्यांचे वडील अंबालाल साराभाई देशातील मोठे कापड उद्योजक होते.

लहानपणापासूनच इंजिन आणि मशीन्सच विक्रम यांना भयंकर वेड होतं. पुढे सायन्स वरचा प्रेम बघून त्यांना इंग्लंडला केंब्रिजमध्ये शिकायला पाठवल.तिथे त्यांनी 1940 मध्ये नॅचरल सायन्स विषयात शिक्षण पूर्ण केले.१९४० चा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता इंग्लंडमध्ये राहणं इतकं सोपं नव्हतं. म्हणून ते भारतात परतले आणि नोबेल विजेते सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली १९४२ मध्ये आपली पीएचडी पूर्ण केली.

१९४२ ला आपली PHD पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतासाठी खूप मोठं काम केलं यात शंकाच नाही. पण त्यासोबत आपण समाजाचे देणं लागतो हे ते कधी विसरले नाहीत. त्यांच्या वडिलांच्या कापड मिल मधील कामगारांसाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले.

एक काळ असा आला की आपलं स्पेस रॉकेटच स्वप्न बाजूला ठेवून त्यांनी कापड गिरणीतील कामगारांची मदत करण्यासाठी स्वतःला झोकून घेतल. पण पुढे पुन्हा ते आपल्या स्वप्नाकडे पुन्हा खेचले गेले मोठ्ठी मजल मारली. पुढे त्यांना भारताचे विज्ञान सल्लागार,अणुऊर्जा प्रकल्प प्रमुख आणि नंतर भारतीय स्पेस प्रोग्रॅम चे अध्यक्ष करण्यात आलं.

1957 ला जेव्हा रशियाने त्याचा स्पुटनिक उपग्रह पाठवला. तेव्हा विक्रम साराभाई यांनी भारतीय पीएम जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या स्पेस कार्यक्रमासाठी कन्व्हेन्स केलं. भारतीय अंतराळ संशोधन समिती (INCOSPAR) ची स्थापना जवाहरलाल नेहरूंनी 1962 मध्ये अणुऊर्जा विभागाअंतर्गत केली. पुढे INCOSPAR 1969 मध्ये ISRO बनले.

ISRO ची स्थापना शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचा आग्रह व कठीण परीश्रमामुळे अंतराळ संशोधनातील गरज ओळखून झाली होती. ISRO आणि IN-SPACE या स्पेस-टेक क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन आणि नियमन करण्यासाठी देशाची महत्वाची एजन्सी आहे.

भारताचे पहिले रॉकेट लॉन्चिंग स्टेशन थुंबा येथे तयार केलं. भारताला स्पेस प्रोग्राम मध्ये भरारी घेण्यासाठी स्वतःचं लॉन्चिंग स्टेशन असणं ही काळाची गरज होती. त्यांनी चर्चाच्या बिल्डिंगमध्ये आपला पहिलं ऑफिस सुरू केला होता.

तुम्ही कदाचित एपीजे अब्दुल कलाम यांचे सायकलवर,बैलगाडीवर रॉकेट घेऊन जातानाचे फोटोज बघितले असतील ते थुंबा येथीलच आहे. या प्रकल्पाचे प्रमुख विक्रम साराभाई होते. अशा या भारताच्या स्पेस प्रोग्राम जनकाचा मृत्यू 1971 मध्ये केरळला झाला. पण त्याआधी त्यांनी भारताला स्पेस प्रोग्राम मध्ये सक्षम केल होत. त्यांच स्वप्न इस्रो आणि आता भारतातील इतर खाजगी कंपन्या पूर्ण करत आहेत.

भारताच्या या नव उद्योजकांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा...----- कुणाल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com