
Solar Eclipse Warnings: यंदा पहिले सुर्यग्रहण २९ मार्चला म्हणजेच उद्याला होणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका तसेच पश्चिम युरोप, वायव्य आफ्रिका आणि रशियामध्ये दिसेल. ते कदाचित सर्वात धोकादायक देखील असेल.
शनिवारी होणारे सूर्यग्रहण डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण ब्लड मून म्हणजेच या महिन्यात झालेल्या पूर्ण चंद्रग्रहणाच्या दोन आठवड्यांनंतर होत आहे. हे सूर्यग्रहण धोकादायक का असणार हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.