
अशा गाड्यांमध्ये फार फीचर्स मिळतील असे नाही पण सात लोकांना एकत्र बाहेर जाता येते एवढे नक्की. याच श्रेणीमध्ये काही उत्तम आणि खिशाला जास्त भार न देणारे पर्याय उपलब्ध आहेत. मग तुमच्या परिवारात सात लोक असतील आणि तुम्ही खिशाला परवडणारे पर्याय शोधात असाल तर नक्की वाचा.
कार ही आजकाल प्रत्येक परिवारासाठी एक महत्वाची गरज बनली आहे. फक्त कमाईवर आधारित प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते. भारतात लोकांना फिरायला अतिशय आवडते, पण कुटुंबातील लोक जास्त असल्याने भाड्याची गाडी करावी लागते. छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबाची गरज एक छोटी आरामदायक गाडी असते.
तसेच पाच ते सात लोकांचे कुटुंब असल्यास एका गाडीतून फिरायला जाणे आरामदायक होत नाही आणि त्यामुळेच अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनींनी आपला मोर्चा परवडणाऱ्या आणि सात लोक बसतील इतकी क्षमता असणाऱ्या गाड्यांकडे वळवला. अशा गाड्यांमध्ये फार फीचर्स मिळतील असे नाही पण सात लोकांना एकत्र बाहेर जाता येते एवढे नक्की. याच श्रेणीमध्ये काही उत्तम आणि खिशाला जास्त भार न देणारे पर्याय उपलब्ध आहेत. मग तुमच्या परिवारात सात लोक असतील आणि तुम्ही खिशाला परवडणारे पर्याय शोधात असाल तर नक्की वाचा.
सात लोकांसाठी पाच सर्वात परवडणाऱ्या कारचे उत्तम पर्याय :
१) मारुती सुझुकी इको
मारुती सुझुकी इको ही सात जण बसण्याची क्षमता असणारी सर्वात स्वस्त गाडी आहे. यामध्ये फार मॉडर्न फीचर्स तुम्हाला मिळणार नाहीत, पण जागा भरपूर आहे. यामध्ये १२०० सीसी क्षमतेचे इंजिन असून ७३ बीएचपी इतकी पॉवर मिळते. पेट्रोल टाकीची क्षमता ४० लिटरची असून सी एन जीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस आणि ईबीडी ही प्रणाली देण्यात आली आहे. तसेच एक एअरबॅग, स्पीड वॉर्निंग, चाईल्ड लॉक देण्यात आले आहेत. पुढे डिस्क ब्रेक असून मागे ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. एसी मात्र या गाडीत देण्यात आला नसून फक्त ब्लोअर आणि हीटर देण्यात आला आहे.
किंमत (लाखांत) : ३.८१ लाख ते ४.९५ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
२) रेनॉ ट्रायबर
रेनॉ ने काही महिन्यांपूर्वी ही गाडी लाँच केली होती आणि सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण इतक्या कमी किंमतीत त्यांनी उत्तम फीचर्स देखील या गाडीत दिले आहेत. तसेच गाडीमध्ये भरपूर स्पेस देखील उपलब्ध करून दिली आहे. तिसऱ्या रांगेतील सीटवर देखील पर्याप्त जागा असून छोटा बांधा असणारे व्यक्ती आरामात बसू शकतात. यामध्ये १००० सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून ७२ बीएचपी इतकी पॉवर मिळते. पेट्रोल टाकीची क्षमता ४० लिटरची असून ऑटोमॅटिक (AMT) चा पर्याय देखील उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस आणि ईबीडी ही प्रणाली देण्यात आली आहे. तसेच दोन एअरबॅग, स्पीड वॉर्निंग, चाईल्ड लॉक, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत. एसी देखील देण्यात आला असून अजूनही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत (लाखांत) : ५.१२ लाख ते ७.३५ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
३) दॅटसन गो+
दॅटसन गो+ हा देखील तुमच्या कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय म्हणता येईल. शेवटच्या दोन सीटवर लहान मुले किंवा मध्यम बांधा असणारे तरुण बसू शकतात. या गाडीमध्ये देखील भरपूर स्पेस असून अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये १००० सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून ७८ बीएचपी आणि ऑटोमॅटिकसाठी ७७ बीएचपी इतकी पॉवर मिळते. पेट्रोल टाकीची क्षमता ४० लिटरची असून ऑटोमॅटिक (CVT) चा पर्याय देखील उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस आणि ईबीडी ही प्रणाली देण्यात आली आहे. तसेच दोन एअरबॅग, स्पीड वॉर्निंग, चाईल्ड लॉक, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत. एसी देखील देण्यात आला असून अजूनही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत (लाखांत) : ४.२० लाख ते ६.९० लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
४) मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकी एर्टिगा ही वर दिलेल्या पर्यायांपेक्षा उंचीला आणि रुंदीला देखील मोठी आहे. गाडीमध्ये ७ जणांसाठी भरपूर जागा असून अनेक अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये १५०० सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून १०५ बीएचपी आणि सी एन जी साठी ९२ बीएचपी इतकी पॉवर मिळते. ऑटोमॅटिक (AT) चा पर्याय देखील उपलब्ध असून सी एन जी इंधनाचा देखील पर्याय उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस आणि ईबीडी ही प्रणाली देण्यात आली आहे तसेच दोन एअरबॅग, स्पीड वॉर्निंग, चाईल्ड लॉक, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत. एसी देखील देण्यात आला असून अजूनही अनेक मॉडर्न फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत (लाखांत) : ७.५९ लाख ते १०.१३ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
किंमत (लाखांत) सी एन जी साठी : ८.९५ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
५) महिंद्रा बोलेरो
महिंद्रा बोलेरो ही गाडी अनेक वर्ष भारतात विकली जात असून दणकट गाडी म्हणून ओळखली जाते. ७ जणांसाठी यामध्ये मुबलक जागा असून सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये बोलेरो नेहमी असते. यामध्ये १५०० सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून ७६ बीएचपी इतकी पॉवर मिळते. ऑटोमॅटिक (AT) चा पर्याय यामध्ये उपलब्ध नाहीये. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस आणि ईबीडी ही प्रणाली देण्यात आली आहे. तसेच एक एअरबॅग, चाईल्ड लॉक, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहेत. एसी देखील देण्यात आला असून अजूनही फार फीचर्स देण्यात आलेले नाहीत.
किंमत (लाखांत) : ८.०१ लाख ते ०९.०१ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)
मग तुमच्या कुटुंबासाठी एकत्र जाण्याची आता जास्त वाट पाहू नका. भरपूर जागा आणि काही गरजेचे फीचर्स असणारे हे पर्याय नक्कीच तुमच्या खिशाला फार त्रास देणार नाहीत एवढे नक्की. मग कोणती गाडी घेणार आणि पुढची संपूर्ण कुटुंबाबरोबरची पुढची ट्रिप कोणती ते नक्की सांगा.