
Best Mileage Cars in Low Price : कार घेणे हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते, पण बजेटमुळे ते बऱ्याच जणांना शक्य होत नाही. तुमच्या बजेटनुसार स्वस्त आणि चांगले मायलेज देणारी कार बाजारात मिळेल का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आपण तुमच्या मनातील हा गोंधळ दूर करणार आहोत. आज आपण भारतीय बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेल्या 5 स्वस्त कार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहेत.
1- Maruti S-Presso
देशात विकल्या जाणाऱ्या सगळ्यात स्वस्त कारच्या यादीत मारुती एस-प्रेसोचे नाव अव्वल आहे. कमी किंमत आणि मायलेजमुळे ही कार भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केली जात आहे.
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 1.0 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे जे 68hp पॉवर जनरेट करते. ही कार 21.7 kmpl चा मायलेज देते आणि कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 4.89 लाख ते 5.06 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
2- Datsun Go
Datsun GO हॅचबॅक ही आजपर्यंत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटाक कारांपैकी एक आहे. यात 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. हे 77 एचपी पॉवर आणि 68 एचपीचा पीक टॉर्क जनरेट करते. सोबतच ही कार 19.59 kmpl चा मायलेज देते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही कार 6.31 लाख ते 6.51 लाख रुपयांत खरेदी करता येईल.
3- Maruti Wagon R
मारुती वॅगनआर भारतीय वाहन बाजारातील सर्वात लोकप्रीय कार्सपैकी एक आहे. ही कार तुम्हाला चांगल्या स्पेससह चांगला परफॉर्मन्स देखील देते. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 68hp पॉवर जनरेट करते आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 83hp पॉवर जनरेट करते. या कारचे मायलेज 21.79 kmpl आहे. तसेच कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 5.48 लाख ते 6.18 लाख रुपयांपर्यंत आहे.
4- Hyundai Santro
या कारमध्ये 1.1 लिटर क्षमतेचे इंजिन आहे दिले जे 69hp पॉवर जनरेट करते आणि ही 20.3 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही कार 5.63 लाख ते 6.35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
5 - Tata Tiago
या कारमध्ये दिलेल्या इंजिनची क्षमता 1.2 लीटर असून ते 86hp ची पॉवर जनरेट करते. यामध्ये इंजिनला 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन एका लिटर पेट्रोलवर 23.84 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा टियागो भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Tata Tiago XE व्हेरिएंटची किंमत 5 लाख लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, Tata Tiago XZ ची एक्स-शोरूम किंमत भारतीय बाजारपेठेत 6.1 लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.