Tata Tiago vs Maruti Celerio : कोणती CNG कार आहे बेस्ट, जाणून घ्या

Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant
Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant

Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत चाललेल्या किंमतीमुळे लोकांचे सीएनजी वाहने (CNG Car) घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन, देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Tata Motors ने आपली लोकप्रिय हॅचबॅक Tata Tiago आणि सेडान Tata Tigor चे CNG मॉडेलसह लॉन्च केली आहे. (Comparison between Tata Tiago & Maruti Celerio)

भारतातील सीएनजी कार (CNG Cars) मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा सर्वात मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत टियागो आणि टिगोर सीएनजी कारची मारुतीच्या कारसोबत स्पर्धा होईल. अलीकडेच, मारुती सुझुकीने त्यांच्या नवीन अपडेट केलेल्या मारुती सेलेरियोची सीएनजी (Maruti Celerio CNG) आवृत्ती लॉन्च केली आहे. आणि आता Tata Motors ने Tata Tiago चे CNG व्हर्जन लॉन्च केले आहे. जाणून घ्या दोनपैकी कोणत्या कारमध्ये किती पॉवर आहे आणि कोणती सीएनजी कार जास्त सुरक्षित आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

आकारात किती फरक आहे?

आकाराबद्दल बोलायचे तर मारुती सेलेरियो सीएनजीची लांबी 3.6 मीटर आहे. तर Tata Tiago CNG ची लांबी 3.7 मीटर आहे. Celerio मध्ये 165mm ग्राउंड क्लीयरन्स उपलब्ध आहे. Tata Tiago चे ग्राउंड क्लीयरन्स 168mm आहे. म्हणजेच टाटा टियागो डोंगराळ भागात आणि खडबडीत रस्त्यांवर ड्रायव्हिंग एक्सपिरिएंस देईल.

Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant
Tata च्या दोन नवीन CNG कार लॉंच; जाणून घ्या किमती-फीचर्ससह सर्वकाही

इंजिन

मारुती Celerio CNG च्या पेट्रोल व्हेरिएंटमघ्ये 1.0-लिटर K10C DualJet इंजिन उपलब्ध आहे. Celerio चे CNG व्हेरिएंट कमाल 57 hp ची पॉवर आणि 82.1 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. तर Tata Tiago CNG ला पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2-लीटर रेव्होट्रॉन 3-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन कमाल 73.4 पीएस पॉवर आणि 95 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. म्हणजेच, पावरच्या बाबतीत, टाटा टियागो सीएनजी कार मारुती सेलेरियो सीएनजीला मागे टाकते.

मायलेज

मायलेजबद्दल बोलायचे तर मारुती सेलेरियो सीएनजी कार भारी ठरते, Celerio CNG चे स्टॅंडर्ड मायलेज 35.60 km/kg असल्याचे मारुतीचे म्हणणे आहे. Tata Tiago CNG च्या मायलेजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या कारबद्दल दावा केला जात आहे की ही कार एक किलो गॅस सीएनजीमध्ये ही 26.49 किमी मायलेज देईल.

Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant
मारुती सुझुकीची नवीन CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

सुरक्षेबाबत कोणती कार आहे बेस्ट

टाटा मोटर्सने आपली Tiago CNG कार किती सुरक्षितबनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कंपनीने आपल्या पहिल्या CNG मध्ये अनोखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. यात गॅस गळती शोधण्याचे फीचर दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत कारमधील सीएनजी लीक झाल्यास, कारमध्ये असलेले गळती शोधण्याचे तंत्रज्ञान ऑटोमॅटिकली वाहन सीएनजी वरून पेट्रोल मोडवर शीफ्ट करेल. यासोबतच हे तंत्रज्ञान ड्रायव्हरला गॅस गळतीबाबत अलर्ट करते. यासोबतच वाहन तात्काळ थांबवण्यासाठी मायक्रो स्वीच देण्यात आला आहे. एवढेच नाही तर अपघात टाळण्यासाठी टाटा टियागो सीएनजी कारमध्ये आणखी एक खास फीतर दिले आहे. कारमध्ये थर्मल प्रकारचा कुठलाही अपघात घडला तर, सिलिंडर फुटू नये म्हणून ती सीएनजी पुरवठा बंद केला जातो त्याच वेळी, ट्यूबमधील उर्वरित गॅस हवेत सोडला जातो.

सेफ्टी रेटिंग किती?

याशिवाय, कार थेट सीएनजीवर सुरू होते . कारमधील सीएनजीचे प्रमाण कमी झाले की ते आपोआप पेट्रोलवर शीफ्ट होते Tata Tiago CNG ही सध्या देशात विक्रीसाठी असलेली एकमेव CNG कार आहे जिला ग्लोबल NCAP सुरक्षा क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुती सेलेरियोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य स्टार रेटिंग मिळाले आहे.

Tata Tiago CNG vs Maruti Celerio CNG car variant
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

किंमत

मारुती सेलेरियो सीएनजीच्या एकाच मॉडेल सध्या उपलब्ध आहे. तर टाटाने 5 वेगवेगळ्या ट्रिममध्ये Tiago CNG लाँच केली आहे. Tiago CNG 5 ट्रिममध्ये उपलब्ध आहे - XE, XM, XT, XZ+ (ST), XZ+ (DT).

जर तुम्ही दोघांमधील फरक पाहिला तर मारुती सेलेरियो सीएनजीची किंमत 6.58 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, Tigao CNG ची एक्स-शोरूम किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरु होते, जी 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com