

Flight Mode
Sakal
Fligh Mode हा फक्त विमान प्रवास करतांना अनेक जण वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का तुमचा फोनमध्ये हा मोड ऑन ठेवल्यास कोणते फायदे मिळतात.
Phone Battery Tips: सर्वच फोनमध्ये फ्लाइट मोड हा पर्याय असतो. सर्वचजण विमान प्रवास करतांना या मोडचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हा मोड फक्त उड्डाणाच्या वेळीच नव्हे तर आपल्या फोनसाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकतो? स्मार्टफोन सतत नेटवर्क, नोटिफिकेशन आणि अॅप्स सुरू असल्याने बॅटरी लवकर संपते आणि डिव्हाइसचे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अशावेळी काही मिनिटांसाठी फोन ‘फ्लाइट मोड’मध्ये ठेवणे म्हणजे त्याला थोडा ‘आराम’ देण्यासारखे आहे. या मोडमुळे बॅटरीचा वापर कमी होतो, फोन गरम होत नाही, तसेच सिग्नल शोधण्याचा ताणही कमी होतो. रात्री झोपताना फ्लाइट मोड ऑन केल्यास मेंदूवरील रेडिएशनचा परिणाम कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता वाढते. म्हणजेच, फ्लाइट मोड हा फक्त विमान प्रवासाठीच फायदेशीर नसून स्मार्टफोनच्या बॅटरीसाठीही उपयुक्त असते.