Flipkart Sale : मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, येथे पाहा यादी

flipkart big bachat dhamaal sale motorola smartphones are on huge discount know offers all details
flipkart big bachat dhamaal sale motorola smartphones are on huge discount know offers all details

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे जो 26 ऑगस्टपासून सुरू झाला असून 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये सर्व ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला मोटोरोला फोन घ्यायचा असेल, तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. कारण या सेलमध्ये मोटोच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये तुम्हाला कोणता फोन किती रुपयांना स्वस्त मिळेल जाणून घेऊया..

Moto G31

तुम्हाला मिडीयाटेक हिलीयो जी 85 प्रोसेसर असलेला Moto चा हा फोन Flipkart सेलमध्ये 25% च्या सवलतीत मिळेल. याशिवाय तुम्ही SBI Mastercard डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% ची सूट देखील मिळेल. त्याच वेळी, तुम्ही 364 रुपये प्रति महिन्यांच्या EMI वर देखील फोन खरेदी करू शकता. Moto G31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स दिली आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.

Moto G60

Flipkart 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येणार्‍या Moto G60 वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. सेलमध्ये हा फोन 31% डिस्काउंटवर विकला जात आहे. त्याच वेळी, SBI कार्ड धारकांना 10% ची इंस्टट सूट देखील मिळेल. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, तुम्ही तुमच्या जुन्या फोनला बदलून 14,400 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. Moto G60 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो.

flipkart big bachat dhamaal sale motorola smartphones are on huge discount know offers all details
OnePlus चे अगदी स्वस्तातले इयरफोन्स लाँच; किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये

Moto G71 5G

तुम्ही मोटोरोलाचा लेटेस्ट 5G स्मार्टफोन G71 5G ई-कॉमर्स साइटवरून 30% सूट मिळवून खरेदी करू शकता. SBI क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची इंस्टंट सूट देखील मिळेल. याव्यतिरिक्त, 15,150 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट देखील उपलब्ध असेल. Moto G71 5G फोन 33W टर्बो पॉवर चार्जरद्वारे फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी ऑफर करतो. फोन IP52 रेटिंगसह येतो.

इलेक्ट्रॉनिक्सवर बंपर डिस्काउंट

सेल तुम्हाला सवलतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज खरेदी करू शकता. यावर 80% पर्यंत सूट उपलब्ध आहे. या सेलमध्ये फिटनेस बँड, कॅमेर्‍यांपासून ते फोन कव्हरपर्यंत, तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

flipkart big bachat dhamaal sale motorola smartphones are on huge discount know offers all details
IND vs PAK : सामना कधी, कसा अन् कुठे पहायचा? येथे जाणून घ्या सर्व काही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com