IND vs PAK : सामना कधी, कसा अन् कुठे पहायचा? येथे जाणून घ्या सर्व काही

india vs pakistan asia cup 2022 t20 check match schedule where to watch live streaming date timing here
india vs pakistan asia cup 2022 t20 check match schedule where to watch live streaming date timing here

भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ 9 महिन्यांनंतर दुबईमध्ये पुन्हा एकदा एकमेकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी 2021 च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते. मात्र तेव्हा झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 10 विकेट्सच्या फरकाने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या सेनेशी मागील पराभवाचा हिशेब बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

सामना फ्री मध्ये पाहाता येणार..

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. दरम्यान हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तुम्हाला हॉटस्टार अॅप आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवला जाईल. भारत विरुद्ध पाक सामना भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. ज्यांच्याकडे हॉटस्टार अॅप किंवा स्टार स्पोर्ट्सचे सदस्यत्व नाही ते डीडी स्पोर्ट्स चॅनलवर (डीडी फ्री डिश) वर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विनामूल्य पाहू शकतात.

india vs pakistan asia cup 2022 t20 check match schedule where to watch live streaming date timing here
Asia Cup India Vs Pakistan : सामन्याची खेळपट्टी आहे कशी, हवामानाचा अंदाज काय सांगतोय?

सामन्यावेळी हवामानाचा अंदाज काय?

भारत पाकिस्तान सामन्यावेळी तापमान थोडे उष्णच राहील. तापमान जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सीस असेल. या भागात 28 ऑगस्टला पाऊस पडणार असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. संध्याकाळी आद्रता देखील कमी असेल.

स्टेडियमची लांबी रूंदी कशी आहे?

दुबईचे स्टेडियम हे आबू धाबीसारखे मोठे नाही. दुबईची समोरची बाऊंड्री लहान आहे. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. समोरची बाऊंड्री ही 65 मीटर लांब आहे. तर स्क्वेअरची बाऊंड्री ही तुलनेने मोठी आहे. ऑफ साईडची स्क्वेअर बाऊंड्री ही 82 मीटर तर लेगची स्क्वेअर बाऊंड्री ही 80 मीटर आहे. त्यामुळे व्हीमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांना समोरच्या छोट्या बाऊंड्रीचा चांगला फायदा उचलता येईल.

india vs pakistan asia cup 2022 t20 check match schedule where to watch live streaming date timing here
IND vs PAK : Asia Cup च्या पदार्पणाच्या सामन्यात 'या' 2 जिगऱ्यांनी ठोकले शतक

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (सी), केएल राहुल (वीसी), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल , रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान

आशिया चषक 2022 साठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.

india vs pakistan asia cup 2022 t20 check match schedule where to watch live streaming date timing here
OnePlus चे अगदी स्वस्तातले इयरफोन्स लाँच; किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com