
Flipkart Big Bang Diwali sale offers
esakal
Flipkart Diwali Sale Offers : फ्लिपकार्टचा बहुप्रतीक्षित बिग बॅंग दिवाळी सेल आज (11 ऑक्टोबर) रात्री 12 वाजता सुरू होत आहे. या सेलमध्ये सॅमसंग, रियलमी, नथिंग, अॅपल आणि व्हिवो सारख्या टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. फ्लिपकार्ट ब्लॅक आणि प्लस मेंबर्ससाठी ही सेल 10 ऑक्टोबरपासूनच सुरू झाली आहे, तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ती आज मध्यरात्रीपासून खुली होईल. यंदाच्या दिवाळीत तुमच्या आवडीचा स्मार्टफोन घरी आणण्याची ही उत्तम संधी आहे.