
Flipkart Big Billion Days Sale Offers : फ्लिपकार्टचा बहुप्रतीक्षित बिग बिलियन डेज सेल यंदा दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात धमाकेदार ऑफर्स घेऊन येत आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या सेलमध्ये सॅमसंग, अॅपल, रियलमी, मोटोरोला यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केवळ स्मार्टफोन्सच नाही तर स्मार्ट टीव्ही, एसी आणि रेफ्रिजरेटर्ससारख्या घरगुती उपकरणांवरही बंपर सूट मिळणार आहे.