
Flipkart Big Billion Days Sale Ending on 2 October Offers Huge Savings Deals
esakal
Flipkart Big Billion Days Sale Last Date : फ्लिपकार्टच्या बहुप्रतिक्षित बिग बिलियन डेज सेलने 23 सप्टेंबरपासून ग्राहकांना आकर्षक सवलतींची पर्वणी आणली आहे. ब्लॅक आणि व्हीआयपी सदस्यांना 24 तास आधी खरेदीसाठी एंट्री मिळालेल्या या सेल संपण्यात आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. फ्लिपकार्टने अधिकृतपणे जाहीर केले आहे की हा महासेल 2 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी संपेल. या काळात ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, वायरलेस हेडसेट, घरगुती उपकरणे, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, कम्प्युटर आणि लॅपटॉप यांसारख्या विविध गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहेत.