Flipkart Diwali Sale : सणासुदीची शॉपिंग होणार खास, फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलची घोषणा! जाणून घ्या ऑफर्स

Big Diwali Sale : 2 ते 11 नोव्हेंबरपर्यंत फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू असणार आहे.
Flipkart Diwali Sale
Flipkart Diwali SaleeSakal

काही दिवसांपूर्वीच अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे दोन मोठे सेल आयोजित करण्यात आले होते. हे सेल संपून काही दिवस झाले नसतील, तेवढ्यात आता फ्लिपकार्टने आणखी एका मोठ्या सेलची घोषणा केली आहे. 2 ते 11 नोव्हेंबरपर्यंत फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू असणार आहे.

या सेलमध्ये फ्लिपकार्ट स्वतःच्या ब्रँडवर अधिक फोकस करताना दिसत आहे. फ्लिपकार्ट ओरिजिनल्स सामानावर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, टॅबलेट, एसी अशा सर्व गोष्टींवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे.

Flipkart Diwali Sale
Diwali 2023: उठा उठा दिवाळी आली, शॉपिंग करण्याची वेळ झाली! गरजेच्या सामानाची यादी बनवताना या टिप्स येतील कामी

या सेलमध्ये SBI कार्डवर 10 टक्के सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस यूजर्सना आजपासूनच या सेलचा अ‍ॅक्सेस मिळाला आहे. या दिवाळी सेलमध्ये अगदी 10 हजारांपासून स्मार्ट टीव्ही, अन् 7 हजार रुपयांपासून वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. (Tech News)

स्मार्टफोनवर ऑफर्स

या सेलमध्ये iPhone 14 केवळ 49,999 रुपयांना उपलब्ध असेल. ही किंमत सर्व ऑफर्स लागू केल्यानंतरची आहे. सॅमसंग गॅलेक्सी F14 5G हा फोन केवळ 9,990 रुपयांना उपलब्ध असेल. तर, Realme C51 हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 7,999 रुपयांना खरेदी करू शकता. या सेलमध्ये गुगल पिक्सेल 7a या स्मार्टफोनची किंमत साधारणपणे 31,499 रुपये असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com