Flipkart Sale : स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोन; मिळतेय २५% पर्यंत सूट

flipkart big saving days sale 2022
flipkart big saving days sale 2022

flipkart big saving days sale 2022 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खेरदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) सध्या सुरू असून तो 22 जानेवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Flipkart वर महागडे फोन देखील अगदी स्वस्तात मिळतील. (Flipkart Sale News)

यासोबतच Flipkart ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना प्रत्येक डिव्हाइसवर 10% सूट देत आहे. चला तर मग जाणून घेऊया फ्लिपकार्टवर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणते स्मार्टफोन उपलब्ध आहेत आणि त्यांची खासियत काय आहे:

Oppo A12 वर 27% सूट

फ्लिपकार्ट सेलमध्ये Oppo A12 फोन 7,990 रुपयांना विकला जात आहे. हा फोन ICICI बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 7,240 रुपये मोजावे लागतील. फोनला ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे. यासोबत 2 मेगापिक्सेल कॅमेरा हा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी तुम्हाला 5 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

Redmi 9i Sport वर 15% सूट

Redmi 9i स्पोर्ट स्मार्टफोन 8,499 च्या किमतीत उपलब्ध आहे या स्मार्टफोनची स्क्रीन 6.53 इंच असून, यामध्ये 5000mAh बॅटरीसह MediaTek Helio G25 चिपसेट मिळेल. याशिवाय फोनमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी 13-मेगापिक्सलचा कॅमेरा मागील बाजूस आणि 5-मेगापिक्सलचा कॅमेरा समोर देण्यात आला आहे. यावर बँकेकडून डिस्काउंट देखील आहे.

Realme C21Y

तुम्ही Realme C21Y चे 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता, ज्याची किंमत ₹ 9,499 आहे. या फोनमधील मुख्य कॅमेरा 13MP + 2MP + 2MP आणि सेल्फी कॅमेरा 5MP देण्यात आला आहे. फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB रॉम मिळेल जी 256GB पर्यंत वाढवता येते. फोनची स्क्रीन साईज 6.5 इंच आहे आणि HD डिस्प्ले आहे. फोनमध्ये शक्तिशाली 5000 mAh बॅटरी दिलेली आहे.

flipkart big saving days sale 2022
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

Samsung Galaxy F12 वर 26% सूट

फ्लिपकार्ट सेलमध्ये, Galaxy F12 चे 4 GB RAM आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंट 9,499 रुपयांमध्ये विकले जात आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली असून फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे चार सेन्सर दिले आहेत. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो.

Realme Narzo 50i वर बंपर डिस्काउंट

Realme Narzo 50i ची किंमत 7,499 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले आणि SC9863A चिपसेटसह 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज मिळते. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8 मेगापिक्सल कॅमेरा, 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी उपलब्ध असेल. यासोबतच बँक डिस्काउंटचाही लाभ मिळणार आहे.

flipkart big saving days sale 2022
Flipkart चा बंपर सेल! फोन, टीव्हीवर मिळतेय 80% पर्यंत सूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com