फ्लिपकार्ट लवकरच घेऊन येतंय बंपर सेल; मिळणार 80% पर्यंत सूट!

Flipkart Big Saving Days Sale
Flipkart Big Saving Days Sale

Flipkart शनिवार, 12 मार्चपासून बिग सेव्हिंग डेज सेल (Flipcart Big Saving Days Sale) सुरू होत आहे. पाच दिवस चालणारा हा सेल 16 मार्चपर्यंत लाइव्ह असेल. या सेलदरम्यान अनेक लोकप्रिय मोबाईल फोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, कॅमेरा इत्यादींवर बंपर डिस्काउंट दिला जाणार आहे.

या सेल दरम्यान, तु्म्ही iPad Air (2020), Lenovo Yoga Tab आणि Realme Watch 2 सारख्या डिव्हाइसवर डिस्काउंट मिळवू शकाल. फ्लिपकार्ट सेल मर्यादित कालावधीच्या डिल्स आणि ऑफर देखील देईल. याशिवाय, SBI बँक कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर इंस्टट डिस्काउंटचा लाभ देखील देऊ करेल. फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांना सेलचा लवकर एक्सेस मिळेल.

मोबाईल फोनवर ऑफर्स

एका समर्पित वेबपेजवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार , यावेळी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये Apple, Realme, Poco आणि Samsung कडून अनेक मोबाइल फोनवर डील आणि ऑफर देण्यात येतील. SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना एकाधिक मॉडेल्सवर 10 टक्के इंस्टट सूट मिळेल. या व्यतिरिक्त, आम्ही Flipkart कडून एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI ऑफर केले जाण्याची देखील अपेक्षा करू शकतो.

Flipkart ने आधीच एक स्वतंत्र टीझर वेबपेज तयार केले आहे ज्यामध्ये माहिती देण्यात आले आहे की, आगामी सेलमध्ये बजेट, मिड-रेंज आणि फ्लॅगशिप फोनवर सूट देईल. मात्र, किती सवलत किंवा कोणती डील मिळणार याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.

Flipkart Big Saving Days Sale
भारतीय लष्करात नाकारलं; तमिळनाडूतील २१ वर्षाचा इंजिनीअर लढतोय युक्रेनकडून

इलेक्ट्रॉनिक डिव्हासेसवर डिस्काउंट

फोन व्यतिरिक्त, Flipkart Big Saving Days सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 80 टक्के सूट देण्याचा दावा केला जातो आहे. सेल दरम्यान, स्मार्टवॉच आणि वेअरेबलवर 60 टक्क्यांपर्यंत सूट, तर लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

फ्लिपकार्ट सेलदरम्यान सूट मिळणार असलेल्या काही स्मार्टवॉचमध्ये डिझो वॉच 2 , रियलमी वॉच 2 , फायर-बोल्ट निन्जा प्रो मॅक्स आणि अॅमेझफिट बिप यू यांचा समावेश आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टवॉच आणि ब्लूटूथ स्पीकर तसेच Realme आणि OnePlus सह इतर काही कंपन्यांकडून वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरबड्सवर 80 टक्के सूट देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Flipkart Big Saving Days Sale
'आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण..', शरद पवारांना पडळकरांचं प्रत्युत्तर

याशिवाय आसुस, डेल, एचपी आणि लेनोवोसह अनेक ब्रँड्सच्या लॅपटॉपवर काही दमदार डील देण्यात आल्या आहेत. डीएसएलआर आणि मिररलेस कॅमेरे आणि साउंडबारवरही सूट आणि ऑफर उपलब्ध असतील. याशिवाय, फ्लिपकार्ट सेलमध्ये कीबोर्ड आणि माऊससारख्या कॉम्प्युटर अॅक्सेसरीजवर 50 टक्के सूट देण्यात येईल. टॅब्लेटवर 45 टक्क्यांपर्यंत सूट असेल, फ्लिपकार्टने वेगळ्या वेबपेजद्वारे या ऑफर्सची माहिती दिली आहे.

फ्लिपकार्टचा दावा आहे की, Apple iPad Air (2020) , Lenovo Tab M8 2nd Gen, Realme Pad आणि Lenovo Yoga Tab वर सेल दरम्यान सूट मिळेल.

Flipkart Big Saving Days Sale
रशियन खेळाडूचं संतापजनक कृत्य, युक्रेनियन प्रतिस्पर्ध्यासमोर छातीवर लावलं 'Z'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com