Flipkart चा बंपर सेल! 'या' स्मार्टफोन्सवर मिळेल भरघोस सूट

Flipkart Big Saving Days Sale
Flipkart Big Saving Days Sale

Flipkart Big Saving Days Sale : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे आणि तो 27 जुलैपर्यंत चालेल. पण खऱ्या अर्थाने हा सेल 22 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. कंपनीच्या माहितीनुसार, या सेल दरम्यान तुम्हाला स्मार्टफोनसोबतच अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. कंपनी आपल्या उत्पादनांवर सवलत आणि काही बँकांद्वारे ग्राहकांना अतिरिक्त सवलतींसह एक्सचेंज ऑफर देत आहे.

या सेलमध्ये तुम्हाला अॅक्सिस बँक, सिटी बँक, कोटक आणि आरबीएल बँकेच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवर ही सूट मिळू शकेल. दरम्यान फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना (Flipkart Plus Members) या सेल ऑफर मिळू लागल्या आहेत. आज आपण अशा स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही या सेलमधून मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

iPhone 12 - या सेलमध्ये Apple iPhone 12 वर बँक ऑफर नुसार 51,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकते. यात 12 MP चे 2 बॅक कॅमेरे दिले आहेत. तर 12 MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

iPhone 11 - Flipkart च्या या सेलमध्ये iPhone 11 वरही मोठी सूट मिळणार आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या ऑफरसह ग्राहक हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकतात. यामध्ये 12 MP चे 2 बॅक कॅमेरे देखील उपलब्ध आहेत. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर तो सुद्धा 12 MP चा आहे.

Flipkart Big Saving Days Sale
Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांत बेस्ट रिचार्ज प्लॅन, वाचा सविस्तर

Xiaomi 11i - बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, Xiaomi च्या या स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह 19,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. यात 108 MP कॅमेरा दिला आहे.

Moto G60 - हा Motorola फोन ग्राहकांना सेल दरम्यान 13,999 रुपयांना बँक ऑफरसह खरेदी करता येईल. यात 108 MP कॅमेरा देखील आहे.

Vivo T1 44W - Vivo चा हा फोन सेल दरम्यान 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. यात 50 एमपी कॅमेरा दिला आहे.

Flipkart Big Saving Days Sale
सावधान ! Googleवर या गोष्टी चुकूनही शोधू नका; जावे लागेल तुरुंगात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com