फ्लिपकार्टचा Black Friday सेल; iPhone 12 सह अनेक फोनवर बंपर डिस्काउंट | Flipkart Black Friday Sale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 12

फ्लिपकार्टचा Black Friday सेल; iPhone 12 वर आहे बंपर डिस्काउंट

भारतात ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाले असून अनेक वेबसाइट आणि स्टोअर्स मोबाईल आणि इतर प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स देत आहेत. दरम्यान फ्लिपकार्टचा ब्लॅक फ्रायडे सेलही सुरू झाला असून हा 26 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये ग्राहकांना जवळपास सर्व प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर्स आणि डील्स देण्यात येत आहेत. जर तुम्ही आयफोन खरेदी करायचा विचार करत असाला तर तुम्हाला आयफोन्सवर या सेलमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. चला तर मग त्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

iPhone 12

Appleचा iPhone 12 फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट करण्यात आला आहे. या डिव्हाइसवर 2000 चा डिस्काऊंट, तसेच Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक आणि ICICI बँकेकडून 10 टक्के डिस्काऊंट यासोबतच 14,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि प्रति महिना 1,949 रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध असेल. iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा XDR डिस्प्ले, A14 बायोनिक चिपसेट आणि 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे.

iPhone 12 Mini

या सेलमध्ये iPhone 12 Mini हा 44,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 2000 रुपयांची डिस्काऊंट दिली जात आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना अॅक्सिस बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्याच वेळी, हा डिव्हाइस 1,538 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 Mini मध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि A14 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे.

हेही वाचा: बजेटमध्ये मिळतात 'या' सर्वात जास्त मायलेज देणार्‍या एसयूव्ही

iPhone SE

सेलमध्ये iPhone SE स्मार्टफोन 29,999 रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी लिस्टेड आहे. या डिव्हाइसवर अॅक्सिस बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक दिला जाईल तसेच डिव्हाइसवर 15 टक्के सूट मिळेल. याशिवाय, 1,026 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर डिव्हाइस खरेदी करता येईल. iPhone SE तीन स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये 4.7-इंचाचा HD डिस्प्ले, 12MP रिअर कॅमेरा आणि 7MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट उपलब्ध असेल.

हेही वाचा: तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

Web Title: Flipkart Black Friday Sale In India Offers On Iphone 12 And Iphone 12 Mini Check Deals Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :flipkartiphone 12