Flipkart ची बंपर ऑफर! 20 हजारांच्या फोनवर मोठी सूट; मिळू शकतो फक्त 1 हजारांत..जाणून घ्या ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flipkart ची बंपर ऑफर! 20 हजारांच्या फोनवर मोठी सूट; मिळू शकतो फक्त 1 हजारांत.. जाणून घ्या ऑफर

Flipkart ची बंपर ऑफर! 20 हजारांच्या फोनवर मोठी सूट; मिळू शकतो फक्त 1 हजारांत.. जाणून घ्या ऑफर

Flipkart Offer: प्लिपकार्ट ही ऑनलाइन शॉपिंग साइट दररोज ग्राहकांसाठी काहीतरी नवी ऑफर घेऊन येते. सध्या फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल चालू आहे. हा सेल २४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये रियलमीच्या फोन्सवर भारी सूट मिळतेय. जाणून घेऊया का आहे ऑफर. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन हजार रुपयांतही मिळवू शकता.

फ्लिपकार्टने या ऑफरमध्ये रियलमी मोबाईलची किंमत फार कमी केली आहे. Realme 9 ची लॉचिंग प्राइज 20,999 रुपये आहे, मात्र सेलमध्ये तुम्हाला यावर तब्बल चार हजारांची सूट मिळतेय. तसेच तुम्हाला फोनवर एक्सचेंज ऑफरही आहे. असे केल्यास तुमच्या मोबाईलची किंमत आणखी कमी होईल.

Realme 9 वर 16 हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला 16 हजारापर्यंतचा ऑफ मिळू शकतो. जर तुम्हाला हा ऑफर मिळाला तर तुम्हाला रियलीचा फोन केवळ 999 रुपयांतच मिळेल.

हेही वाचा: Cashback Offer : रिचार्ज आणि बिल पेमेंटवर मिळवा 5% कॅशबॅक; 'या' कार्डवर आहे ऑफर

जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा नसेल तुमच्यासाठी बँक ऑफरही उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट एक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 850 रुपयाचा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे तुम्हाला हा मोबाईल 16149 रुपयांत मिळेल.