Laptop Offer: भन्नाट ऑफर! ४० हजारांचा लॅपटॉप फक्त १० हजारात होईल तुमचा, पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infinix Laptop

Laptop Offer: भन्नाट ऑफर! ४० हजारांचा लॅपटॉप फक्त १० हजारात होईल तुमचा, पाहा डिटेल्स

Flipkart Sale: कॉलेजच्या प्रोजेक्टपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील गरजेचा झाला आहे. तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर The Grand Gadget Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्हीसह अनेक वस्तूंना खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इनफिनिक्सच्या लॅपटॉपवर बंपर ऑफर मिळत आहे. तुम्ही Infinix INBook X1 Neo लॅपटॉपला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या लॅपटॉपची किंमत जवळपास ४० हजार रुपये आहे. परंतु, तुम्ही सेलमध्ये फक्त ९ हजार रुपयात खरेदी करू शकता. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Infinix INBook X1 Neo लॅपटॉपवर मिळणार बंपर ऑफर

Infinix INBook X1 Neo Series Celeron Quad Core ला कंपनीने ३९,९०० रुपये किंमतीत लाँच केले होते. परंतु, फ्लिपकार्टवर आता फक्त २४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर ३७ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. या लॅपटॉपचे वैशिष्ट्ये म्हणजे हा खूपच पातळ आणि हलका असून, याचे वजन जवळपास दीड किलो आहे.

हेही वाचा: BMW Bike: भारतात येतेय BMW ची धमाकेदार बाईक, तब्बल १०००cc इंजिनसह मिळतील अफलातून फीचर्स

इनफिनिक्सच्या या लॅपटॉपला खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता. लॅपटॉप खरेदी करण्यासाठी फेडरल बँक अथवा पंजाब नॅशनल बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला ३,४०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. ऑफरचा फायदा मिळाल्यास लॅपटॉपची किंमत २१,५९९ रुपये होईल. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

Infinix INBook X1 Neo वर तब्बल १२,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर जुन्या लॅपटॉपच्या कंडिशनवर अवलंबून आहे. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास इनफिनिक्सच्या या लॅपटॉपला फक्त ९,२९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. इनफिनिक्सचा हा लॅपटॉप दमदार फीचर्ससह येतो.