Flipkart वरुन औषधे मिळणार घरपोच! सुरु केली ऑनलाईन फार्मसी

Walmart Flipkart business from 15th September will go on agitations
Walmart Flipkart business from 15th September will go on agitations

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आता औषधे तुमच्या घरापर्यंत पोहोचवणार असून कंपनीने त्यांच्या Flipkart Health+ उपक्रमांतर्गत ऑनलाइन फार्मसी सुरू केली आहे. ही ई-कॉमर्स वेबसाइट तिच्या वापरकर्त्यांना ऑनलाइन वैद्यकीय सल्ला आणि डायग्नोसीस देखील देण्याची तयारी करत आहे. फ्लिपकार्टने अलीकडेच सस्तासुंदर मार्केटप्लेस लिमिटेडचा टेकओव्हर केले आहे

फ्लिपकार्टने ऑनलाइन फार्मसी आणि डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म विकत घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, कंपनीने हा करार किती मोठा आहे, याचा खुलासा केलेला नाही. यासोबतच, कंपनीने आपला Flipkart Health+ उपक्रम सुरू केला असून, ज्याचा उद्देश आपल्या ग्राहकांना परवडणारी आणि सोयीस्कर आरोग्यसेवा देणे हा असल्याचा दावा केला आहे. हा ऑनलाइन फार्मसी स्पेस SastaSundar.com या नावाने प्रसिध्द आहे.

SastaSundar.com हे भारतातील एक प्रसिद्ध डिजिटल हेल्थकेअर आणि फार्मसी प्लॅटफॉर्म आहे. याला 490 पेक्षा जास्त फार्मसीच्या नेटवर्कद्वारे सपोर्ट केला जातो. भारतातील वापरकर्त्यांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. अथॉराईज्ड फार्मसीजकडून उत्पादने खरेदी करते आणि त्यांना देशभर पुरवठा केला जातो. ही फर्म या नेटवर्कद्वारे पर्सनल काऊंसलिंग देते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित विविध समस्यांसाठी उपचाराची सोय देणारी ही पहिली कंपनी आहे.

Walmart Flipkart business from 15th September will go on agitations
Hyundai ची Ionic 5 इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जवर धावेल 481 किमी

कंपनीचा यामागचा उद्देश भारतीय वापरकर्त्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी कंपनी प्रथम ई-फार्मसीपासून सुरुवात करण्याचा विचार करत आहे. फ्लिपकार्ट हेल्थ+ वापरकर्ते त्यांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे औषध खरेदी करु शकतील आणि ते त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर, कंपनीच्या योजनेबद्दल बोलताना, कंपनी वेळेनुसार ई-डाययग्नोस्टीक आणि ई-कन्सल्टेशनसह नवीन आरोग्य सेवा देण्याचाही विचार करत आहे.

यांच्याशी असेल थेट स्पर्धा

फ्लिपकार्टच्या या टेकओव्हरमुळे पुर्वीपासून असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांना चांगलीच स्पर्धा मिळणार आहे. अॅमेझॉन इंडियाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बेंगळुरूमध्ये अॅमेझॉन फार्मसी सुरू केली. दुसरीकडे, टाटा डिजिटलने या वर्षाच्या सुरुवातीला फ्लिपकार्ट सारखी ऑनलाइन फार्मसी 1mg विकत घेतली होती.

Walmart Flipkart business from 15th September will go on agitations
येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com