येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स | Jeep SUV | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jeep SUV

येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

भारतातील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एका दमदार कारची भर पडणार आहे. अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीप भारतात तिच्या 7 सीटर Jeep Meridan SUV सोबत सब-कॉम्पॅक्ट SUV लॉंच करण्याच्या तयारीत आहे. जीपची ही सब-कॉम्पॅक्ट SUV भारतात Hyundai Venue, Kia Sonnet, Maruti Suzuki Vitara Brezza, Mahindra XUV300 आणि Tata Nexon यांच्याशी थेट स्पर्धा करेल. अप कंमींग सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे अधिकृत नाव आणि इतर डिटेल्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ही भारतात लॉंच केले जाईल, असा दावा केला जातोय.

मिळणार 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन

काही रिपोर्ट्सनुसार कंपनीची ही सब-कॉम्पॅक्ट SUV कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. ही आगामी SUV 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येईल, जी सुमारे 100bhp पॉवर जनरेट करेल. अशी अफवा आहे की ही सब-कॉम्पॅक्ट SUV ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह येणारे सेगमेंटमधील पहिले वाहन असेल.

हेही वाचा: इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार

7-स्लॅट ग्रिल आणि LED DRL मिळणार?

कंपनी येत्या सर्व प्रकारांमध्ये AWD प्रणाली देऊ शकते. जीपच्या एस सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे डिझाइन आणि तपशील सध्या गुपित ठेवण्यात आले आहेत. काही तज्ञांचा असा दावा आहे की, कंपनी या गाडीमध्ये त्यांची सिग्नेचर 7-स्लॅट ग्रिल, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, स्पोर्टी ब्लॅक क्लॅडिंग, अलॉय व्हील्स आणि एलईडी टेललॅम्प देखील दिले जाऊ शकतात.

किंमत काय असेल?

कंपनीची ही आगामी सब-कॉम्पॅक्ट SUV देशातील सर्वात परवडणारी SUV असेल. असे मानले जाते की, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते. त्याच वेळी, त्याच्या टॉप-एंड वेरियंटची किंमत सुमारे 13 लाख रुपये असू शकते.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

loading image
go to top