Flipkart UPI : आता 'फोन-पे', 'अमेझॉन-पे'ला टक्कर देणार फ्लिपकार्ट; लाँच केली स्वतःची यूपीआय सर्व्हिस

Flipkart-Axis Bank : यामुळे आता फ्लिपकार्टच्या ग्राहकांना शॉपिंग पेमेंट करण्यासाठी थर्ड-पार्टी पेमेंट अ‍ॅपवर अवलंबून रहावं लागणार नाही. यूजर्स थेट फ्लिपकार्टमधूनच पेमेंट करू शकतील.
Flipkart UPI Service
Flipkart UPI ServiceeSakal

Flipkart Launches UPI Service in India : एकीकडे 'पेटीएम'चा वाद सुरू असतानाच, फ्लिपकार्टने गुपचूप आपली यूपीआय सेवा भारतात लाँच केली आहे. यासाठी फ्लिपकार्टने अ‍ॅक्सिस बँकेसोबत करार केला आहे. यामुळे आता फ्लिपकार्टच्या ग्राहकांना शॉपिंग पेमेंट करण्यासाठी थर्ड-पार्टी पेमेंट अ‍ॅपवर अवलंबून रहावं लागणार नाही. यूजर्स थेट फ्लिपकार्टमधूनच पेमेंट करू शकतील. सोबतच यूजर्सना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देखील फ्लिपकार्टचा वापर करता येईल.

फ्लिपकार्ट ग्रुपचे 50 कोटींहून अधिक रजिस्टर्ड यूजर्स आहेत, तसंच या प्लॅटफॉर्मवर 14 लाखांहून अधिक सेलर्स याठिकाणी आहेत अशी माहिती कंपनीने दिली. यामध्ये फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, फ्लिपकार्ट हेल्थ प्लस आणि क्लिअरट्रिप या सर्व सेवांचा समावेश आहे. फ्लिपकार्टची यूपीआय सेवा ही या सर्व प्लॅटफॉर्मवर वापरता येणार आहे.

फ्लिपकार्ट सुरुवातीला ही सेवा केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध करणार आहे. नंतर टप्प्या-टप्प्याने ही सेवा आयओएस आणि वेब यूजर्ससाठी देखील उपलब्ध होईल, असं कंपनीने स्पष्ट केलं. फ्लिपकार्टची स्पर्धक असलेल्या अमेझॉनने यापूर्वीच भारतात आपली अमेझॉन-पे यूपीआय सर्व्हिस सुरू केली आहे. यासोबतच फूड डिलिव्हरी अ‍ॅप असणाऱ्या झोमॅटोने देखील काही दिवसांपूर्वी आपली यूपीआय सेवा लाँच केली आहे.

Flipkart UPI Service
Sam Altman Net Worth : 'ओपन एआय' कंपनीत नाही एकही शेअर.. मग अब्जाधीश सॅम अल्टमनला कुठून मिळतो पैसा?

असा करता येईल वापर

यूजर्स आपल्या फ्लिपकार्ट अ‍ॅपमधूनच नवीन यूपीआय आयडी तयार करू शकणार आहेत. यानंतर शॉपिंग पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर करता येणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करताना पेमेंटसाठी दुसरं अ‍ॅप उघडण्याची गरज भासणार नाही. यामुळे लोकांचा शॉपिंगचा अनुभव आणखी चांगला होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com