Order Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर कॅन्सल करताय? आता द्यावे लागणार चक्क इतक्या रुपयांचे शुल्क, फ्लिपकार्ट अन् मिंत्राचे नवे नियम पाहा

Flipkart myntra announce cancellation charges for orders : ऑनलाईन खरेदी करताना Flipkart आणि Myntra या प्लॅटफॉर्म्सवर ऑर्डर कॅन्सल केल्यास शुल्क आकरले जाणार आहे.
Flipkart myntra announce cancellation charges for orders
flipkart and myntra will charge for cancelling orders affecting remote shopperesakal
Updated on

Flipkart and Myntra Oder Cancellation Charges : ऑनलाईन खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या Flipkart आणि Myntra या प्लॅटफॉर्म्सवर खरेदी आता थोडी महागडी होण्याची शक्यता आहे. लवकरच ऑर्डर रद्द केल्यावर ग्राहकांना शुल्क आकारले जाईल, अशी माहिती काही अहवालांतून समोर येत आहे.

ऑर्डर रद्द केल्यावर शुल्क का?

आजकाल ऑनलाईन खरेदी ही अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. फक्त मोबाईलवर काही टिचक्या मारल्या की घरबसल्या खरेदी शक्य होते. परंतु, यापुढे Flipkart वर ऑर्डर रद्द करणे सोपे आणि विनामूल्य राहणार नाही. काही विशिष्ट वेळेनंतर ऑर्डर रद्द केल्यास ग्राहकांना शुल्क भरावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

Flipkart च्या अंतर्गत मेसेजनुसार, विक्रेत्यांच्या आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या वेळेचे आणि पैशाचे नुकसान टाळण्यासाठी ही नवी पद्धत सुरू करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे ऑर्डर रद्द करण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Flipkart myntra announce cancellation charges for orders
Google Search in 2024 : स्त्री 2 ते IPL अन् बाली,मनाली! 2024 मध्ये भारत टॉपवर, वर्षभरात गुगलवर सर्च केल्या 'या' गोष्टी

Myntra चा दावा आणि Flipkart च्या भूमिकेवर प्रतीक्षा

Myntra ने स्पष्ट केले आहे की, सध्या त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि सोशल मीडियावर पसरलेली माहिती खोटी आहे. Flipkart कडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

Flipkart myntra announce cancellation charges for orders
WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं गेम चेंजर फीचर! आत्ताच बघून घ्या हे नवीन अपडेट

ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?

हा निर्णय विक्रेत्यांचे नुकसान कमी करण्यासाठी घेतला जात असला, तरी ग्राहकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. ऑनलाइन खरेदी करताना ऑर्डर रद्द करताना काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे.

या नव्या नियमांमुळे ग्राहकांचा ऑनलाईन खरेदी करण्याचा अनुभव बदलण्याची शक्यता आहे. Flipkart आणि Myntra यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा झाल्यावरच नेमके धोरण स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com