
Flipkart Sale offers huge discounts: फ्लिपकार्टवर पुन्हा एक नवीन सेल सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरील हा नवीन फ्रीडम सेल दिवाळीपूर्वीचा सर्वात मोठा सेल असणार आहे. या सेलमध्ये फ्रीडम डील्स, रश अवर डील्स, एक्सचेंज ऑफर्स आणि बंपर ऑफर्स देण्यात येणार आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस मोठ्या सवलतीत उपलब्ध असतील.
तर या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनपासून ते लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, एसी, फ्रीज इत्यादींवर चांगली सूट देणार आहे. याशिवाय सेलमध्ये अनेक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही ऑफर दिल्या जाणार आहेत.
फ्लिपकार्टचा हा सेल १ ऑगस्ट रोजी केवळ प्लस वापरकर्त्यांसाठी सुरू होणार आहे. तर २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून सामान्य वापरकर्त्यांसाठी खुला होणार आहे. हा सेल किती काळ चालेल हे मात्र अद्यापपर्यंत सांगितलेले नाही. पुढील महिन्यात फ्लिपकार्ट तसेच अमेझॉनवर फ्रीडम सेल आयोजित केला जाणार आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल आयोजित केले जातात.
यामध्ये, अनेक बँकांच्या कार्डवर १५ टक्केपर्यंत बँक डिस्काउंट किंवा कॅशबॅक दिला जाईल. याशिवाय, प्लस आणि व्हीआयपी सदस्यांना १० टक्केची अतिरिक्त सूट मिळेल. फ्लिपकार्ट व्हीआयपी आणि प्लस वापरकर्त्यांना एक दिवस आधी सेल ऑफर मिळण्यास सुरुवात होईल.
त्याच वेळी, सामान्य वापरकर्त्यांसाठी ही विक्री २ ऑगस्टपासून सुरू होईल. ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, वॉलमार्टच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ७८ फ्रीडम डील उपलब्ध असतील. या डीलमध्ये, उत्पादनांच्या खरेदीवर ७८ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते. तथापि, कंपनीकडून याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.