
Flipkart Sale : या स्मार्टफोनवर मिळतेय ११ हजार २५० रुपयांची सूट
मुंबई : जर तुम्ही सॅमसंगचे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वत:ला कमी किंमतीत एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Flipkart सेल दरम्यान Samsung Galaxy F22 स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत विकला जात आहे.
अनेक आकर्षक ऑफर्स अंतर्गत हा स्मार्टफोन विकला जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर उशीर करू नका. सेल दरम्यान, तुम्ही 11,000 रुपयांच्या सूटसह हा फोन खरेदी करू शकता.
हेही वाचा: Amazon offer : १० हजारांचा फोन मिळवा फक्त ५०० रुपयांत
Samsung Galaxy F22:
Flipkart सेल दरम्यान, हा स्मार्टफोन 20% डिस्काउंटसह ₹ 11,999 मध्ये सूचीबद्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही किंमत 64 GB व्हेरिएंटची आहे. एवढेच नाही तर फोनवर 11,250 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुमच्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल तरच तुम्हाला पूर्ण ऑफर मिळेल.
तुम्ही हा हँडसेट दरमहा 2000 हजार रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत देखील खरेदी करू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला Axis Bank आणि Kotak Bank क्रेडिट कार्डवर 10% ची झटपट सूट मिळेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
हेही वाचा: Apple युजर्सना मोठा धक्का ! iPhone 14च्या लॉन्चबाबत ही माहिती आली समोर
Samsung Galaxy F22 ची वैशिष्ट्ये
डिव्हाइसमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. फोनचे वजन 203 ग्रॅम आणि 159.9×74.0×9.3 मिमी आहे.
Web Title: Flipkart Sale A Discount Of 11 Thousand 250 Rupees Is Available On This Smartphone
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..