
Flipkart Sale: निम्म्या किंमतीत खरेदी करा हेडफोन्स-स्पीकर, ऑफरचा आज शेवटचा दिवस
Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल सुरू आहे. ६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सेलचा आज (८ जानेवारी) शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्हाला हेडफोन आणि स्पीकरवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.
सेलमध्ये हेडफोन आणि स्पीकर तब्बल ७० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तसेच, ० इंट्रेस्ट ईएमआय ऑफरचा देखील फायदा मिळेल.
हेही वाचा: Google Chrome: गुगल क्रोम होणार बंद! लॅपटॉप वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम
boAt Rockerz 235 Pro वर मिळेल बंपर ऑफर
boAt Rockerz 235 Pro या ब्लूटूथ इयरफोनला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. १,९९० रुपये किंमतीच्या या इयरफोन्सला तुम्ही फक्त ९९९ रुपये किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. यावर ४९ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, Boult Audio Pro Bass इयरफोन्सला ४,९९९ रुपयांऐवजी फक्त १,९९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर ७६ टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.
Boult Audio AirBass Xpods TWS Earbuds ची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, ७४ टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त १२९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, Noise Air Buds Mini २,९९९ रुपयांऐवजी फक्त ९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ६६ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल.
ब्लूटूथ स्पीकरला स्वस्तात करा खरेदी
Mivi Fort S16 साउंडबारला ग्राहक २,९९९ रुपयांऐवजी अवघ्या १४९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकतात. सेलमध्ये JBG Go Essential स्पीकर ४६ टक्के डिस्काउंटनंतर १,५९९ रुपयात उपलब्ध आहेत. स्पीकरची मूळ किंमत २,९९९ रुपये आहे.
फ्लिपकार्टवर Zebronics Zeb Vita Plus फक्त १३९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर ४४ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, सेलमध्ये BoAt Stone 1208 ब्लूटूथ स्पीकरला ४९ टक्के डिस्काउंटनंतर अवघ्या ३,४९९ रुपयात खरेदी करता येईल.