Smartphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! फक्त ३० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय iPhone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone

Smartphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! फक्त ३० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय iPhone

Offer On iPhone 12 Mini: आयफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, कमी बजेटमुळे शक्य होत नाही. मात्र, आता तुमचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ५जी सपोर्टसह येणाऱ्या iPhone 12 Mini ला तुम्ही फक्त ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

ई-कॉमर्स साइट Flipkart वर iPhone 12 Mini ३८ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनवर तुम्हाला बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. फोनवर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घ्या.

हेही वाचा: ChatGPT vs Satya Nadella: 'बिर्याणी'वरून सत्या नडेला ChatGPT ला नडले, पाहा नक्की काय घडलं

iPhone 12 Mini वर मिळेल बंपर ऑफर

ई-कॉमर्स साइट Flipkart वर iPhone 12 Mini चे ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंटनंतर फक्त ३७,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल.

याशिवाय, IDFC FIRST क्रेडिट कार्ड EMI ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही फोनला ६,३३४ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयसह खरेदी करू शकता. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फोनवर २३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. याशिवाय ३ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.

हेही वाचा: CES 2023: सरड्याप्रमाणे गाडीही बदलणार रंग अन् मारणार गप्पा... पाहा BMW ची भन्नाट कार

iPhone 12 Mini मध्ये मिळेल जबरदस्त फीचर्स

तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा चांगला पर्याय आहे. मात्र, हे जुने मॉडेल आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच आयफोन १४ सीरिजला लाँच केले आहे. मात्र, या मॉडेलसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.

iPhone 12 Mini च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ५.४ इंच Super Retina XDR डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तसेच, ५जी कनेक्टिव्हिटी देखील मिळेल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर