CES 2023: सरड्याप्रमाणे गाडीही बदलणार रंग अन् मारणार गप्पा... पाहा BMW ची भन्नाट कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMW i Vision Dee

CES 2023: सरड्याप्रमाणे गाडीही बदलणार रंग अन् मारणार गप्पा... पाहा BMW ची भन्नाट कार

BMW i Vision Dee car: कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये दरवर्षी काही हटके गॅजेट्स, कारला लाँच केले जाते. यावर्षी देखील काही शानदार गॅजेट्स या इव्हेंटमध्ये सादर झाले आहेत. यातील सर्वाधिक चर्चा BMW च्या कॉन्सेप्ट कारची होतेय.

जर्मन कार निर्माता कंपनी BMW ने CES 2023 मध्ये खास टेक्नोलॉजीसह येणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या कॉन्सेप्टला सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार आपोआप रंग बदलू शकते. कंपनीने CES मध्ये आपली हटके कार i Vision Dee ला सादर केले. ही एक इलेक्ट्रिक स्पोर्ट सेडान कार आहे.

हेही वाचा: ChatGPT vs Satya Nadella: 'बिर्याणी'वरून सत्या नडेला ChatGPT ला नडले, पाहा नक्की काय घडलं

BMW i Vision Dee

BMW i Vision Dee

कंपनीचा दावा आहे की, ही कार केवळ रंगच बदलत नाही, तर तुमच्याशी संवाद देखील साधू शकते. तसेच, कार गळाभेट देखील घेईल. याआधी देखील कंपनीने iX Flow या रंग बदलणाऱ्या कॉन्सेप्ट कारला सादर केले होते. यावर्षी सादर केलेल्या i Vision Dee कारबाबत कंपनीचा दावा आहे की, गाडीला कमांड दिल्यास ३२ रंग बदलू शकते. एवढेच नाही तर कार 240 E Ink e-paper सेगमेंटने बनलेली आहे, ज्यामुळे सहज कंट्रोल करणे शक्य आहे. कार काही सेकंदात वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये देखील बदलू शकते.

बीएमडब्ल्यूने प्रसिद्ध बॉडी बिल्टर आणि हॉलिवूड अभिनेता Arnold Schwarzenegger यांच्या उपस्थितीत या कॉन्सेप्ट कारला सादर केले आहे. Arnold यांना घेऊन कंपनीने एक शॉर्ट फिल्म देखील बनवली असून यात ही कार कशाप्रकारे काम करते, याबाबत सांगितले आहे.

हेही वाचा: Elon Musk: इलॉन मस्क राजकारणात एंट्री करणार? पोल घेत म्हणाले...

या टेक्नोलॉजीचा केला वापर

BMW च्या या कॉन्सेप्ट कारमध्ये अमेरिकेतील ई इंक (E Ink) कॉर्पोरेशनद्वारे तयार करण्यात आलेल्या टेक्नोलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. ही टेक्नोलॉजी ई-रीडर आणि स्मार्टवॉचमध्ये देखील पाहायला मिळते. कारच्या फिल्म कोटिंगमध्ये मायक्रोकॅप्सूल देण्यात आले आहेत, जे विजेच्या पुरवठ्याने बदलतात. BMW नुसार ही टेक्नोलॉजी ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी खूपच फायदेशीर आहे. ई-पेपर सेगमेंटचा उपयोग कारचे व्हील्स आणि ग्रिलवर देखील करण्यात आला आहे.

कार बाजारात कधी येणार?

BMW ची ही कॉन्सेप्ट कार रस्त्यावर धावताना कधी दिसणार याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. कार एका इन-हाउस रिसर्च अँड डेव्ह लपमेंट (R&D) प्रोजेक्टचा भाग आहे. कॉन्सेप्ट कार असली तरी सर्वांचेच लक्ष या टेक्नोलॉजीकडे वेधले गेले आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

टॅग्स :carAutomobile