Flipkart Sale: धमाकेदार ऑफर! जुना फोन द्या अन् नवीन घेऊन जा, फक्त ८०० रुपये करा खर्च

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर खास सेलची सुरुवात झाली आहे. सेलमध्ये REDMI Note 10S स्मार्टफोनला खूपच स्वस्तात उपलब्ध आहे.
REDMI Note 10S
REDMI Note 10SSakal

Offer on REDMI Note 10S Phone: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर खास सेलची सुरुवात झाली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रेडमीचा महागडा स्मार्टफोन खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही सेलमध्ये REDMI Note 10S स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

REDMI Note 10S
Jio Prepaid Plans : जिओचे सर्वात स्वस्त प्लॅन; दररोज मिळतो 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स अन् बरंच

REDMI Note 10S वर मिळेल बंपर ऑफर

REDMI Note 10S च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे. मात्र, २१ टक्के डिस्काउंटनंतर हा फोन १६,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. Flipkart Axis Bank Card ने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळेल. याशिवाय, SBI Credit Card ने पेमेंट केल्यास १ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.

रेडमीच्या या फोनला तुम्ही एक्सचेंज ऑफरसह स्वस्तात खरेदी करू शकता. जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १५,७०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेलवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा फोन फक्त ८०० रुपयात तुमचा होईल.

हेही वाचा: OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च! मिळतो दमदार प्रोसेसर अन् कॅमेरा, जाणून घ्या किंमत

Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी आणि Mediatek Helio G95 Processor चा सपोर्ट मिळतो. या फोनच्या खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी मिळतो. तुम्ही जर कमी किंमतीत फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन चांगला पर्याय आहे.

हेही वाचा: धनंजय मुंडेंच्या तब्येतीवर अजित पवारांकडून अपडेट; 'त्या' गोष्टीचा पुर्नउच्चार करत म्हणाले…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com