फ्लिपकार्टवर सुरू आहे भन्नाट सेल, ३८ हजारांचा फोन मिळतोय अवघ्या ८ हजारात | Smartphone Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nothing Phone

Smartphone Offer: फ्लिपकार्टवर सुरू आहे भन्नाट सेल, ३८ हजारांचा फोन मिळतोय अवघ्या ८ हजारात

Offer On Nothing Phone (1): ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Year End Sale 2022 सुरू आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल ३१ डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Nothing Phone (1) चा विचार करू शकता. ३८ हजार रुपयांचा हा फोन फक्त ८ हजार रुपयात खरेदी करू शकता. फोनवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Rishabh Pant: ऋषभ चालवत असलेली कार सुरक्षेच्याबाबतीत आहे अव्वल, मिळतात जबरदस्त सेफ्टी फीचर्स

Nothing Phone (1) ची किंमत आणि ऑफर

Nothing Phone (1) च्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून फक्त २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर १० हजार रुपये डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

Nothing Phone (1) ला खरेदी करण्यासाठी फेडरल बँक अथवा बँक ऑफ बडोदाच्या कार्डचा वापर केल्यास २,८०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. यानंतर फोन फक्त २५,१९९ रुपयात उपलब्ध होईल. यानंतर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Nothing Phone (1) वर मिळेल एक्सचेंज ऑफरचा फायदा

Nothing Phone (1) फोनमध्ये १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि एक्सचेंज ऑफरवर उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास नथिंगचा हा पहिला वहिला फोन फक्त ७,६९९ रुपयात खरेदी करू शकता.

Nothing Phone (1) चे फीचर्स

नथिंगच्या या फोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + ५० मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon ७७८G+ प्रोसेसरसह येतो. यात १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.

हेही वाचा: Apple iPhone 15: लाँचआधीच iPhone 15 चे फीचर्स लीक, किंमतीचाही खुलासा; पाहा संपूर्ण डिटेल्स

टॅग्स :mobilephoneflipkart