esakal | Facebook पासवर्ड विसरलात का? जाणून घ्या कसं रिसेट करायचं

बोलून बातमी शोधा

forgot password of facebook account step follow for reset passward}

नवा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला ईमेल आयडी आणि नंबरची आवश्यकचा भासते. 

Facebook पासवर्ड विसरलात का? जाणून घ्या कसं रिसेट करायचं
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : फेसबुकचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल - आयडी लक्षात ठेवावा लागेल. ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करण्यासाठी होतो. त्या शिवाय तुमच्या फोन नंबरचा वापरही तुम्ही करू शकता. साधारणत: जुना पासवर्ड विसरल्यास नवीन पासवर्ड रिसेट करावा लागतो.

नवा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला ईमेल आयडी आणि नंबरची आवश्यकचा भासते. यावेळी तुम्ही फरगॉटन अकाउंट करून नवीन पासवर्ड ट्राय करु शकता.
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर यांसारखे ॲप ज्याचा वापर आजच्या आधुनिक काळात प्रत्येकजण करत आहोत. यासारखे बरेच ॲप आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये लॉग इन केलेले असतात. ज्यामुळे सारखे ईमेलआयडी आणि पासवर्ड घालून चालू करता येतात. जास्त वेळ आयडी चालू न केल्यास आपण त्याचा पासवर्ड विसरून जातो.

जर तुम्ही पण फेसबुकचा पासवर्ड विसरला असाल, आणि दुसऱ्या डिव्हाईसमध्ये जर चालू होते नसेल तर आम्ही त्यावर तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. खरंतर फेसबुक पासवर्ड  विसरल्यामुळे रिसेट करण्याची सुविधा असते. जर तुम्हाला तुमचा पासवर्ड लक्षात नसेल तर या आपण जाणून घेऊया की फेसबुक पासवर्ड कश्या पद्धतीने रिसेट करायचं.

1. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी पासवर्ड द्यावा लागेल. पासवर्ड दिल्यानंतर  फरगॉटन अकाउंटवर क्लिक करावे.

2. पुढच्या स्क्रीनवर तुमचा रजिस्टर ईमेल आयडी किंवा फोन नंबरचा वापर करावा लागेल.

3. वर दिलेल्या उपायांमधील जो तुम्ही निवडाल त्यावर तुम्हाला एक कोड डीलिवर केला जाईल.

4. आता जो कोड तुम्हाला मिळाला आहे तो नेक्स्ट स्क्रीनवर भरा किंना फीलअप करा.

5. आता तुमच्यासमोर नवीन पेज खुले होईल तिथे तुम्ही नवीन पासवर्ड सेट करा.

6. आता या नवीन पासवर्ड सोबत तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करू शकता.