Fossile Fuel : पेट्रोल भरायला गेल्यावर जीवावर बेततील अशा गोष्टी करणं टाळा

पेट्रोल आणि डिझेल सारख्या जीवाश्म इंधन लवकर पेट घेते
Fossile Fuel
Fossile Fuelesakal

Fossile Fuel : पेट्रोल आणि डिझेल सारख्या जीवाश्म इंधन लवकर पेट घेते. या इंधनाचा पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात साठा केला जातो. अशा ठिकाणी सेफ्टी प्रोटोकॉल पाळावे लागतात. यासाठी तुमची पहिली जबाबदारी आहे की तुमच्या गाडीत इंधन भरण्यासाठी जाताना पेट्रोल पंपावर सतर्क राहणे. कोणत्याही पेट्रोल पंपवर गेल्यावर तुम्ही बेसिक गोष्टी पाळल्या पाहिजेत. इंधन भरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. जसं की,

Fossile Fuel
Netweb Technologies IPO : लवकरच नेटवेब टेक्‍नोलॉजीजचा आयपीओ येणार

इंधन भरताना इंजिन बंद करा : जेव्हा तुमच्या वाहनात पेट्रोल भरत असता, तेव्हा गाडीचे इंजिन बंद करा. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी कारमध्ये इंधन भरताना इंजिन बंद ठेवणे केव्हाही सुरक्षित असते.

Fossile Fuel
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

आगीपासून दूर राहा : पेट्रोल स्टेशनवर आग लागेल अशा वस्तू कधीही वापरू नका. कधीही लायटर किंवा मॅचबॉक्स वापरू नका. याशिवाय भिंगाचा वापर देखील करू नका.

Fossile Fuel
Tata Altroz CNG And Punch CNG : आता टाटा पंच आणि अल्ट्रोझ येणार इलेक्ट्रिक-सीएनजी अवतारात

मोबाईल फोन बंद करा : मोबाईल फोनमधून रेडिएशन बाहेर पडतात. तुमचे डिव्‍हाइस उन्हात तापून त्याचा स्फोट होऊ शकतो. अशावेळी पेट्रोल पंपावर आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. शिवाय इंधन भरायला गेल्यावर मोबाईल फोनवर बोलणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, लक्षात ठेवा की इंधन स्टेशनमध्ये जाण्यापूर्वी तुमचा फोन बंद ठेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com