Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेटसाठी 'ही' आहे शेवटची तारीख, आत्ताच करून घ्या महत्वाचे बदल

Adhar Update Last Date : आधार कार्डातील माहिती अद्ययावत करण्यासाठी फ्री अपडेटची तारीख आता वाढवण्यात आली आहे.
free aadhaar card update last date
free aadhaar update last dateesakal
Updated on

Aadhaar Update Process : भारतीय नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आधार कार्डातील माहिती अद्ययावत करण्यासाठी फ्री अपडेटची सेवा आता 14 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधी ही सेवा 14 डिसेंबर 2024 ला बंद होणार होती, मात्र आता ती दीर्घकालीन करण्यात आली आहे.

फ्री अपडेटसाठी ‘myAadhaar’ पोर्टल

नागरिकांना आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख यांसारखी माहिती मोफत अपडेट करण्याची संधी UIDAI देत आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, ‘myAadhaar’ पोर्टलवरून काही सोप्या पायऱ्यांमधून करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, 15 जून 2025 नंतर आधार अपडेटसाठी जवळच्या आधार सेंटरला जावे लागेल आणि त्यासाठी 50 रुपये शुल्क लागू होईल.

आधार अपडेट का करावे?

UIDAI ने सुचवले आहे की, ज्या नागरिकांचा आधार 10 वर्षांपूर्वी तयार झाला आहे आणि अद्याप त्यात कोणतेही बदल केले गेले नाहीत, त्यांनी त्यामधील माहिती पुनःप्रमाणित (Revalidate) करणे आवश्यक आहे. यामुळे आधारवरची माहिती नेहमी अचूक राहील आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल.

free aadhaar card update last date
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 2 जबरदस्त फीचर्सची एंट्री! कसं वापरायचं? पाहा एका क्लिकमध्ये

ऑनलाइन आधार अपडेट कसे करावे?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालील पद्धत वापरता येईल.

1. myAadhaar पोर्टलला भेट द्या: आपल्या आधार क्रमांकाने लॉगिन करा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP टाका.

2. दस्तऐवज अपलोड करा: वैध ओळखपत्र (Proof of Identity) व पत्त्याचा पुरावा (Proof of Address) यांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

3. रिक्वेस्ट सबमिट करा: विनंती सबमिट केल्यानंतर तुम्हाला 14-अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल, जो ट्रॅकिंगसाठी उपयोगी ठरेल.

free aadhaar card update last date
Oneplus 13 Launch : नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात; या तारखेला लाँच होतोय Oneplus 13, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

पत्ता अपडेट करण्यासाठी प्रक्रिया

जर तुम्हाला तुमच्या आधारवरील पत्ता बदलायचा असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

1. आधार सेल्फ-सर्व्हिस पोर्टलवर लॉगिन करा.

2. “अपडेट अ‍ॅड्रेस” पर्याय निवडा.

3. नवीन पत्ता टाका आणि वैध पत्त्याचा पुरावा अपलोड करा.

4. विनंती सबमिट करा आणि URN नोट करून ठेवा. अपडेट पूर्ण झाल्यानंतर नवीन आधार कार्ड डाउनलोड करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com