

Free Fire Game Update : भारतीय गेमर्ससाठी 2025 हे वर्ष खास ठरणार आहे, कारण Garena च्या लोकप्रिय Free Fire Battle Royale गेमचे भारतात पुन्हा पदार्पण होणार आहे. 2022 मध्ये IT Act 69A च्या उल्लंघनामुळे या गेमवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता Garena या गेमला भारतीय शैलीत भारतात पुन्हा एंट्री घेण्यासाठी सज्ज आहे.
2022 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या Free Fire ने भारतात 10 मिलियनपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते मिळवले होते. त्यानंतर Garena ने 2023 मध्ये गेम पुन्हा लॉन्च करण्याचा विचार केला होता, मात्र काही कारणांमुळे हे लाँच पुढे ढकलण्यात आले. 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात Garena ने 'Free Fire India' या नावाने गेमच्या पुनरागमनाचा टीझर जाहीर केला होता.
Free Fire च्या पुनर्लाँचची आणखी एक खास गोष्ट म्हणजे महेंद्रसिंह धोनी यांचा सहभाग. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी या प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ज्यामुळे या गेमबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे.
Garena ने यावेळी भारतीय वापरकर्त्यांसाठी गेममध्ये काही विशेष बदल केले आहेत. त्यामध्ये ग्राफिक्स आणि मॅप्स जे भारतीय संस्कृतीशी सुसंगत डिझाईन्स आणि लोकेशन्स देतील.
अॅप स्टोअर्सवर उपलब्धता असेल. गेम लाँच झाल्यानंतर Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध होईल.
Free Fire च्या बंदीचा फायदा घेत Battlegrounds Mobile India (BGMI) ने भारतात मोठा गेमिंग बेस तयार केला. मात्र, Free Fire च्या पुनरागमनामुळे BGMI ला जोरदार स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
बॅनच्या काळातही Free Fire Max हा व्हर्जन भारतात उपलब्ध होता, जो गेमर्सच्या मनोरंजनासाठी महत्त्वाचा पर्याय ठरला. आता 'Free Fire India' च्या आगमनामुळे या दोन्ही व्हर्जन्समध्ये काय फरक असेल, याची उत्सुकता आहे.
Free Fire च्या पुनरागमनामुळे भारतीय गेमिंग क्षेत्रात नवा टप्पा गाठला जाईल. खेळाडूंसाठी भारतीय थीमसह हा गेम एक नव्या अनुभवाचा आनंद देईल. गेमच्या अधिकृत लाँच डेटची वाट पाहत असताना, Free Fire पुन्हा एकदा भारतीय गेमिंग बाजारपेठ गाजवणार, हे निश्चित!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.