YouTube दाखवणार आता फ्री TV चॅनल्स! नव्या सर्विसची टेस्टिंग सुरू | Free TV Channels On YouTube | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Free TV Channels On YouTube

YouTube दाखवणार आता फ्री TV चॅनल्स! नव्या सर्विसची टेस्टिंग सुरू

सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube वर आता फ्री टिव्ही चॅनल स्ट्रीमिंग दाखवणार आहे म्हणजेच लवकरच तुम्हाला YouTube वर काही टिव्ही चॅनल्स मोफत लाईव्हमध्ये पाहायला मिळतील.
GMSArena नुसार YouTube आपल्या प्लॅटफॉर्मवर टिव्ही चॅनल्सची फ्री लाईव्ह स्ट्रीमिंगची सर्विस जोडू शकतात पण ही एक जाहीरात समर्थित सर्विस असणार ज्याचा अर्थ टिव्हीसारखंच तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने जाहीरात दाखवू शकतात. (Free TV Channels On YouTube new service testing started )

रिपोर्टनुसार युट्यूब प्लॅटफॉर्मवर सध्या सर्विसची टेस्टींग सुरू आहे. टिव्ही शोज, मूवीज आणि पूर्ण टिव्ही चॅनल्सला स्ट्रीम करण्यासाठी विभिन्न कंपन्यांसोबत बातचीत सुरू आहे. या सर्विसला टेस्ट करण्यासाठी काही YouTube यूजर्सला निवडण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार YouTube आता दर्शकांच्या इंटरेस्टचा अंदाज लावत आहे आणि जर सर्व प्लॅननुसार झाले तर Google ची मालकी असणाऱ्या सर्व सर्विस कंपन्यांपासून जाहीरात रेवेन्यूमध्ये 45 टक्केची कमीशनची मागणी केली जाणार.

नुकतीच स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मने NFL संडे तिकीटसोबत एक डील केली आहे आणि या वर्षापासून YouTube TV आणि YouTube Primetime चॅनल्सवर स्ट्रीम केले जाणार.

YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवर Shorts क्रिएटर्ससोबत आपल्या जाहीरातपासून होणाऱ्या कमाईला शेअर करणे ही सुरू केले आहे. रिपोर्टनुसार टिकटॉकच्या तुलनेत सर्विसला अधिक आकर्षिक बनवणार आहे.