Social Media | मुलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणारे पालक जाणार तुरुंगात french parents will go to jail for sharing children's photos and videos on social media without their permission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

Social Media : मुलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणारे पालक जाणार तुरुंगात

मुंबई : सोशल मीडियाच्या युगात प्रायव्हसी हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अशा परिस्थितीत नवीन सोशल मीडिया कायद्याची गरज आहे. नवीन सोशल मीडिया कायदा २६ मे २०२१ रोजी भारतात लागू झाला.

यामध्ये परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, फ्रान्सने या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य.... (french parents will go to jail for sharing children's photos and videos on social media without their permission )

मुलांच्या परवानगीशिवाय पालक फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकणार नाहीत

मुलांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेत, फ्रान्सने एक नवीन विधेयक मंजूर केले आहे, ज्यामध्ये मुलांच्या परवानगीशिवाय पालक त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू शकत नाहीत.

म्हणजेच पालकांनी परवानगीशिवाय मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यास त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो. या विधेयकाचा उद्देश मुलांची गोपनीयता बळकट करणे हा आहे.

नवीन विधेयकानुसार, जर पालकांपैकी एकाने मुलांचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन शेअर केले, तर आई आणि वडील दोघेही त्यांच्या मुलांच्या गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी संयुक्तपणे जबाबदार असतील.

असा निर्णय का घेतला गेला

खरंतर, काही काळापासून फ्रान्समध्ये मुलांच्या पालकांच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. तेव्हापासून, लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी वापरले जाऊ शकतात अशी भीती निर्माण झाली.

मुलांच्या फोटोंचा गैरवापर

एका अहवालानुसार, चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी वापरले जाणारे ५० टक्के फोटो आणि व्हिडिओ पालकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या खात्यांमधून घेतले जातात. नवीन सोशल मीडिया विधेयक फ्रेंच सिनेटने मंजूर केले आहे. त्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळेल. त्यानंतर हे विधेयक देशात लागू होईल.