Bike Evolution: डिझेलवर डुरडुरणाऱ्या फटफटी आता इलेक्ट्रिक झाल्या! असा होता भारतात बाईक्सचा प्रवास

Bike evolution in India: सूरज आणि टॉरस बुलेट या दोन्ही गाड्यांमध्ये ३२५ सीसी क्षमतेचं डिझेल इंजिन बसवण्यात आलं होतं.
Diesel Bike to electric bike - Bike evolution in India
Diesel Bike to electric bike - Bike evolution in IndiaEsakal

Bike evolution in India: जगातील दुचाकी बनवणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे प्लांट्स सध्या भारतात आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा भारतात केवळ दोनच कंपन्या दुचाकी बनवत. विशेष म्हणजे, तेव्हाच्या दुचाकी या डिझेल इंजिनवर चालत.

भारतात दुचाकींची विक्री १९४८ सालापासूनच सुरू झाली होती. बजाज ऑटो कंपनीने वेस्पा स्कूटर आणि तीन चाकी गाड्यांना विदेशातून आयात करून देशात विकण्यास सुरूवात केली होती. पुढे भारतात गाड्या बनवण्यास एपीआय आणि रॉयल इनफिल्ड या दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला.

डिझेलवर चालायची बाईक

भारतातील दुचाकी बनवणारी प्रसिद्ध कंपनी रॉयल इनफिल्डने सुरूवातीच्या काळात डिझेल इंजिन असणाऱ्या बाईक्स (Royal Enfield Diesel Bikes) लाँच केल्या होत्या. सूरज आणि टॉरस बुलेट अशा या दोन बाईक्स होत्या. टॉरस बुलेट ही १९८०च्या दशकात भारतात लाँच झाली होती.

Diesel Bike to electric bike - Bike evolution in India
Xpulse 200 4V : नव्या रुपात लाँच झाली हीरोची जबरदस्त ऑफरोडिंग बाईक! जाणून घ्या नवे फीचर्स आणि किंमत

सूरज आणि टॉरस बुलेट या दोन्ही गाड्यांमध्ये ३२५ सीसी क्षमतेचं डिझेल इंजिन (Diesel Bikes in India) बसवण्यात आलं होतं. टॉरस बुलेट ही एक लीटर डिझेलमध्ये ७० किलोमीटरचे मायलेज देत होती, तर सूरज ही गाडी ८६ किमी प्रतिलीटर एवढे मायलेज देत होती.

प्रदूषणामुळे झाली बंद

डिझेल इंजिन असणाऱ्या गाड्या उत्तम मायलेज देत होत्या. तसेच, त्या काळात डिझेलची किंमत देखील अगदी कमी होती. त्यामुळे या गाड्या अगदी कमी कालावधीमध्ये भरपूर लोकप्रिय झाल्या होत्या.

मात्र, या गाड्यांचा एक मोठा तोटा होता. या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते. त्यामुळे भारतात डिझेल इंजिन असणाऱ्या दुचाकींवर बंदी लागू करण्यात आली.

Diesel Bike to electric bike - Bike evolution in India
E Bike : पोलिसांना आता पर्यावरणपूरक ई-बाईक

पेट्रोलच्या गाड्यांचा प्रवास

या दरम्यान भारतात पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी भरपूर प्रसिद्ध होत होत्या. लूना, चेतक, व्हेस्पा अशा कित्येक गाड्या सामान्यांच्या पसंतीस उतरत होत्या. त्यानंतर काही वर्षांमध्येच भारतात स्पोर्ट्स बाईकचं फॅड वाढलं. बॉलिवूडच्या धूम या चित्रपटाने तर स्पोर्ट्स बाईक्सची लोकप्रियता आणखी वाढवली. सध्या पेट्रोलच्या दुचाकींमध्ये ऑफरोडिंग आणि स्पोर्ट्स बाईक्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इको-फ्रेंडली इलेक्ट्रिक बाईक्स

डिझेलच्या तुलनेत पेट्रोलच्या गाड्यांमुळे कमी प्रदूषण होत असले, तरीही या गाड्यांची संख्याही भरपूर वाढली आहे. तसंच चारचाकी गाड्या, कारखाने यांची संख्याही वाढल्याने एकूणच प्रदूषण वाढलं आहे. शिवाय पेट्रोलच्या किंमती देखील गगनाना भिडल्या आहेत. त्यामुळे, लोक आता इलेक्ट्रिक बाईक्सकडे वळू लागले आहेत.

वीजेवर चालणाऱ्या या बाईक्स कोणत्याही वायूचे उत्सर्जन करत नाहीत, त्यामुळे प्रदूषणाचा धोका कमी होतो. सरकार अशा गाड्या घेण्यासाठी सबसिडी देते. शिवाय, पेट्रोलच्या तुलनेत या गाड्यांचा खर्चही अगदी कमी असतो. त्यामुळे लोक दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक दुचाकी वापरू लागले आहेत. सध्या ओला, एथर, होंडा अशा कित्येक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच केल्या आहेत. बजाजनेही जुन्या काळात प्रसिद्ध झालेली आपली चेतक स्कूटर इलेक्ट्रिक इंजिनसह नव्या रुपात पुन्हा लाँच केली आहे.

Diesel Bike to electric bike - Bike evolution in India
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com