esakal | फळे आणि भाज्या महिलांसाठी हितकारक
sakal

बोलून बातमी शोधा

फळे आणि भाज्या महिलांसाठी हितकारक

फळे आणि भाज्या महिलांसाठी हितकारक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

आहारामध्ये भरपूर पालेभाज्या, फळांचा समावेश असावा, असे नेहमी सांगितले जाते. महिला मात्र याकडे दुर्लक्ष करतात. आता असं दुर्लक्ष करू नका, कारण फळे आणि भाज्या महिलांना हृदयविकारापासून वाचवू शकतात, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. यासाठी अमेरिकेतील अडीच हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला.

ज्या तरुण महिला सकस आहार घेतात त्यांच्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद होण्याचे प्रमाण कमी असते. वाहिन्या बंद झाल्यामुळेच हृदयविकाराचा धोका संभवतो. परंतु हाच नियम पुरुषांच्या बाबतीत लागू होत नाही. शास्त्रज्ञांनाही अजूनही हे कोडे उलगडले नाही. याबाबत बोलताना मिनेपोलिस हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. मायकेल मॅडेमा म्हणाले, ""पुरुषांच्या बाबतीत आहारातील फळे आणि भाज्या परिणामकारक ठरत नाहीत, असे याआधीच्या काही अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र त्याचे शास्त्रीय कारण आम्हाला मिळालेले नाही.'' कमी वयात सकस आहार घेण्याच्या सवयी विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले. या अभ्यासात सहभागी लोकांच्या खाण्याच्या सवयीसुद्धा लक्षात घेतल्या आणि आणि त्यावरून खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तरुणांवर कसा परिणाम करतात, हे शोधण्यात आले.

loading image