

Gaganyaan Mission
sakal
बंगळूर : भारताची महत्त्वाकांक्षी गगनयान मोहीम हळूहळू प्रगती करत आहे आणि जवळपास ९० टक्के मोहिमेचे काम पूर्ण झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी गुरुवारी (ता. २३) सांगितले. ते म्हणाले, ‘‘गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे.