Gautam Adani Car : इथे पगार पुरेना अन् अदानींनी खरेदी केली कोटींची कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Gautam Adani Car : इथे पगार पुरेना अन् अदानींनी खरेदी केली कोटींची कार

Gautam Adani Range Rover : गौतम अदानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. जेव्हा त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही बातमी समोर येते तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात येतात. मात्र, यावेळी ते एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत.

हेही वाचा: 5G in India : गौतम अदानी एअरटेल-जिओला देणार टक्कर! मिळाला परवाना

चर्चेत येण्याचे कारणाही खास असून, अदानींनी त्यांच्या ताफ्यात रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ४ कोटी एवढी असून, या गाडीचे फिचर्सदेखील खास आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम अदानी यांनी लँड रोव्हरकडून रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या वाहनाची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. हॉटेस्टकारसिन नावाच्या पेजने इंस्टाग्राम पोस्टमध्ये गौतम अदानी यांच्या रेंज रोव्हर वाहनाचा फोटो अपलोड केले आहेत.

गौतम अदानी यांनी खरेदी केलेली कार पांढऱ्या रंगाची असून, ही सेवन सीटर आहे. या गाडीमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आली आहे. बाहेरील बाजूस LED हेडलाइट्स आणि DRLs सह मोठे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

तर, गाडीच्या आतील भागात 13.1-इंच टचस्क्रीन, चार-झोन क्लायमेट कंट्रोल, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस डिव्हाइस चार्जिंग आणि 3D सराउंड साउंड सिस्टम आहे. अदानींकडे BMW 7-Series, Toyota Vellfire, Audi Q7, Ferrari California आणि Rolls-Royce Ghost या सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.