
९ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळवा स्मार्टटीव्ही
मुंबई : इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम ब्रॅण्डने नवीन ३२ इंच वाय१ स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. फक्त ८,९९९ रूपये इतकी स्वस्त किंमत असलेला हा स्मार्ट टीव्ही देशातील सर्वात परवडणारा ३२ इंच स्मार्ट टीव्ही आहे.
या टीव्हीमध्ये विभागातील सर्वाधिक इन-बिल्ट अॅप्ससोबत इतर सोयिस्कर वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यामधून अमर्यादित कन्टेन्ट पाहण्यासाठी उच्च दर्जाची पिक्चर क्वॉलिटी खात्री मिळते. हा स्मार्ट टीव्ही १८ जुलैपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. (smart TV launch )
हेही वाचा: Apple युजर्सना मोठा धक्का ! iPhone 14च्या लॉन्चबाबत ही माहिती आली समोर
इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कपूर म्हणाले, "या स्मार्ट टीव्हीमध्ये आकर्षक एचडी स्क्रिन, बेझेल-लेस डिझाइन आणि शक्तिशाली सराऊंड साऊंड आहे. या डिवाईसला विभागातील अग्रणी बनवण्यासाठी आणि युजर्सना अपवादात्मक लाभ देण्यासाठी आम्हाला या किंमतीच्या विभागामध्ये लोकप्रिय अॅप्लीकेशन्स सादर करण्याचा आनंद होत आहे.
या टीव्हीमध्ये यूट्यूब, अॅमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह, झी५, एरॉस नाऊ, यप्पटीव्ही, आज तक, प्लेक्स व हॉटस्टार आहे. इतर वैशिष्ट्ये म्हणजे २० वॅट स्पीकर्ससह डॉल्बी ऑडिओ, मिराकास्ट, वाय-फाय, एचडीएमआय, यूएसबी कनेक्टीव्हीटी आणि इतर अनेक सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. इन्फिनिक्स ३२ वाय१ सह आम्हाला स्वस्त विभागातील स्मार्ट टीव्हींचे लोकशाहीकरण करण्याचा आणि प्रत्येक भारतीय कुटुंबाला स्वस्त पर्याय देण्याचा विश्वास आहे".
हेही वाचा: Nokia C21 Plus : एकदाच चार्ज करा आणि तीन दिवस वापरा
वैविध्यपूर्ण पिक्चर क्वॉलिटी आणि आकर्षक रंगसंगती व शार्पर डिटेल्सध्ये तुमचे आवडते चित्रपट व शोजचा आनंद देण्यासाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये एचएलजी सिग्नल आहे, जो प्रखर व गडद रंगछटांमध्ये अनेक नैसर्गिक रंग आणि सखोल कॉन्ट्रास्ट देतो. १२०० (टाइप) कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि २५० नीट्स ब्राइटनेसचे संयोजन सुस्पष्ट व प्रखर चित्रांच्या निर्मितीसाठी ब्राइटनेस लेव्हल्स डिम करण्यामध्ये व समायोजित करण्यामध्ये मदत करते.
या स्मार्ट टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, सोनीलिव्ह, झी५, एरॉस नाऊ, आज तक इत्यादी सारखे स्ट्रिमिंग अॅप्स प्री-इन्स्टॉल केलेले आहेत. ग्राहक अॅप स्टोअरमधून कोणतेही अॅप डाऊनलोड न करता मोठ्या स्क्रिनवर अनेक तास चित्रपट, मालिका व न्यूज लाइव्ह पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
३२ वाय१ स्मार्ट टीव्हीमध्ये संपन्न, सुस्पष्ट, उच्च दर्जाचा सिनेमॅटिक साऊंड अनुभव देण्यासाठी शक्तिशाली डॉल्बी ऑडिओ आहे. तसेच या टीव्हीमध्ये सुधारित साऊंड दर्जासाठी २० वॅट आऊटपुट बॉक्स स्पीकर्स आहेत, ज्यामुळे युजर्सना होम-थिएटर सारखा अनुभव मिळतो.
नवीन इन्फिनिक्स ३२ वाय१ स्मार्ट टीव्हीमध्ये क्वॉड-कोअर शक्तिशाली प्रोसेसरची शक्ती असण्यासोबत उच्च कार्यक्षमतेसाठी ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज आहे.
इन्फिनिक्स ३२ वाय१ बेझेल-लेस फ्रेम आणि अत्यंत स्लीक डिझाइनसह येतो. रिमोट कंट्रोल देखील उत्तम हँड फिलसाठी अत्यंत स्लिम डिझाइन करण्यात आला आहे आणि या रिमोट कंट्रोलवर यूट्यूब व प्राइम व्हिडिओसाठी हॉट कीज आहेत.
या स्मार्ट टीव्हीमध्ये उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेसह युजर्सना त्वरित कनेक्टीव्हीटी पर्याय देण्यासाठी वाय-फाय, ३ एचडीएमआय, २ यूएसबी, लॅन, ऑप्टिकल आणि मिराकास्ट आहे. याव्यतिरिक्त या टीव्हीमध्ये तुमच्या स्मार्टफोनच्या यूट्यूब अॅपमधील कोणताही व्हिडिओ प्रत्यक्ष टीव्हीवर पाहण्यासाठी क्रोम-कास्ट बिल्ट इन आहे.
Web Title: Get A Smart Tv For Less Than 9 Thousand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..