व्हॉट्सऍपवरच्या आक्षेपार्ह मेसेजबाबत थेट तक्रार करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली - सोशल मिडिया म्हटलं की स्पॅम सेमेजेस येतातच. व्हॉट्सऍप देखील याला अपवाद नाही. परंतु, अशा प्रकारचे अक्षेपार्ह मेसेजेस तुम्हाला आल्यास आता थेट केंद्रीय दूरसंचार विभागाकडे तक्रार करता येणार आहे. ही माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीं व्हॉट्सऍपवर आक्षेपार्ह मेसेज येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

अशी तक्रार दाखल करताना पुरावा म्हणून तुम्हाला आलेल्या आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तो पाठवायचा आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाचे दळणवळण नियंत्रक आशीष जोशी यांनी ट्विट केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, व्हॉट्सऍपवर कोणालाही कोणत्याही प्रकारचा मानहानिकारक, आक्षेपार्ह, अश्लील मेसेज किवा जीवे मारण्याची धमकी आल्यास त्या व्यक्तीने या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तो विभागाकडे पाठवावा. दूरसंचार विभाग संबंधित टेलिकॉम ऑपरेटरशी तसेच पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक ती कारवाई करेल.' 

तुमच्या मोबाईलनंबरसह काढलेला स्क्रीनशॉट ccaddn-dot@nic.in येथे पाठविल्यावर तुमची तक्रार दाखल होणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Getting offensive WhatsApp messages? You can now register complaint with DoT