जीमेल येतंय नव्या रुपात; होणार महत्वपूर्ण बदल

gmail changes logo and other
gmail changes logo and other

नवी दिल्ली: गुगलने ईमेल सेवा देणाऱ्या जीमेलमच्या लोगोत मोठा (Gmail New Logo) बदल केला आहे. जीमेलचा लोगो बदलला असून त्यातील आयकॉनिक इनवेलप काढलं आहे. आता जीमेलच्या युसर्सना जीमेलच्या लोगोत फक्त 'M' असं दिसेल. ज्यामध्ये लाल, निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगांचं मिश्रण असेल. लवकरच जीमेलचा लोगो नव्या रुपात आपल्या सर्वांना दिसणार आहे. गूगलने जीमेलचा लोगो बदलतच प्रसिध्द जी सुटच्या सेवेचं रिब्रॅंडींग करुन जी सूट वर्कप्लेस असं केलं आहे.  

मागील काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंग सर्विस मीटमध्येही नव्या दोन बदल्याच्या घोषणा केली होती. ज्याची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यानच गूगलने कॅंलंडर, डॉक्स, मीट आणि शीट्सच्या लोगोतही अपडेट केले आहेत. याचा उद्देश जीमेलच्या रचनेशी जुळवाजुळव करणे हा होता. 

नवीन जीमेल कसे दिसेल-
सध्या जीमेलचा लोगो लाल रंगाच्या इनवेलपचंच आहे. ज्यामध्ये M या शब्दात इनवेलपची प्रतिमा आहे. आता कंपनीने आपल्या टीमशी बरीच चर्चा करून जीमेलचा आयकॉनिक लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही प्रक्रिया सोपी नव्हती ,असं जीमेल टीमचे म्हणणे आहे. पुढे बोलताना गुगलमधील तज्ज्ञांनी सांगितलं की, जेव्हा जेव्हा जीमेलचा लोगो बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा आम्हाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर आमच्या प्रयत्नांना ब्रेक लागला होता. आताचा जीमेल लोगो अतिशय विचारपूर्वक बदलण्यात आला आहे आणि तो अधिक चांगल्या प्रकारे सादर केला जात आहे. आता जीमेलचा लोगो अगदी रंगीबेरंगी आणि आधुनिक दिसत आहे.

गुगलने आपल्या उत्पादनांमध्ये आणखी कोणते बदल केले?
गुगलने जी सूटसाठीही एक इंटिग्रेटेड सिस्टीम तयार केली आहे, ज्यामध्ये जीमेल, मीट आणि चॅटसह इतर सुविधा एकाच ठिकाणी दिली जात आहेत आणि त्याच्या वर्कप्लेसला नाव देण्यात आलं आहे. यामुळे युजर्स एकाच ठिकाणी विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतो.

अलीकडच्या काळात घरातून कामाचा ट्रेंड वाढल्यामुळे लोकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असणे आवश्यक वाटते, जे त्यांच्या कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरते. गुगलने वापरकर्त्यासाठी एक इंटिग्रेटेड सिस्टीम वर्कप्लेस लाँच केला आहे. येणाऱ्या काळात गुगल आपल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये जी सूट युजर्स अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात आणि फ्री युजर्स मर्यादित सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

(edited by-pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com