घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

अनिल कांबळे
Monday, 5 October 2020

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेडिशनल टिव्ही पेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. स्मार्ट टिव्ही देखील काही प्रमाणात त्याच सॉफ्टवेअरचा वापर करून बनवण्यात येतो ज्याचा वापर स्मार्ट फोनसाठी केला जातो.

नागपूर : नवनवीन टेक्नॉलॉजी सध्या येत असून प्रत्येक जण इंटरनेटशी जुळलेला आहे. हातातील फोनपासून ते घरातील टीव्हीपर्यंत सर्वकाही ‘स्मार्ट व्हर्जन’ आले आहे. मात्र हिच टेक्नॉलॉजी अनेकांचे संसार बिघडवू शकते. स्मार्ट टीव्हीमुळे घरात घडत असलेले प्रत्येक क्षण अलगद टिपल्या जातात. याच टेक्नॉलॉजीचा गैरफायदा सायबर हॅकर्स घेतात. घरातील टीव्ही हॅक करून खंडणीची मागणी करू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेडिशनल टिव्ही पेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. स्मार्ट टिव्ही देखील काही प्रमाणात त्याच सॉफ्टवेअरचा वापर करून बनवण्यात येतो ज्याचा वापर स्मार्ट फोनसाठी केला जातो. स्मार्ट टिव्हीसाठी इंटरनेटची देखील आवश्यकता असते. त्यामुळे स्मार्ट टिव्ही हॅक करणे सोपे झाले असून, हॅकर्स आता टिव्हीला टार्गेट बनवत आहेत. 

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

स्मार्ट टिव्हीमध्ये कॅमेरे लावलेले असतात. हॅकर्स स्मार्ट टिव्ही हॅक करून कॅमेरा आणि मायक्रोफोन कंट्रोल करू शकतात. ज्याप्रमाणे मालवेअर असलेल्या अ‍ॅपद्वारे फोन हॅक केला जातो. त्याचप्रमाणे मालवेअर असलेले अ‍ॅप डाऊनलोड केल्याने स्मार्ट टिव्ही देखील हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे स्मार्ट टिव्ही वापरणाऱ्यांनी आत्ताच सावधान होणे गरजेचे आहे. अन्यथा डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

आवाजही होणार कॅच

स्मार्ट टीव्हीमध्ये रिमोटला मायक्रोफोन असतो. मायक्रोफोनमुळे आवाजाद्वारे टिव्हीवरील चॅनल बदलवता येते. रिमोटला वॉइस कमांड देऊन टिव्ही चालत. त्यामुळे घरातील आवाजही स्मार्टटीव्ही कॅच करतो. जर बेडरूमध्ये तुमच्या समोर टिव्ही आहे आणि तुम्हाला माहिती देखील नाही की, तुम्हाला कोणीतरी बघत आहे. तुमचे बोलणे ऐकत आहे. बेडरूममधील कोणतेही क्षण तो कॅमेरा टिपू शकतो.

हे करा

- स्मार्ट टिव्हीमध्ये कॅमेरा सेटिंग्जमध्ये जाऊन डिसेबल करा
- सेटिंग्जमध्ये जाऊन मायक्रोफोन बंद करा
- टीव्ही वरचेवर अपडेट करा
- स्मार्ट टिव्हीमध्ये बिनकामाचे अ‍ॅप अनइन्स्टॉल करा
- स्मार्ट टिव्हीला सिक्युअर वाय-फायशी कनेक्ट करा

अधिक वाचा - "आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

टेक्नॉलाजी अपडेट होत आहे. त्याचा गैरवापर हॅकर्स करतात. त्यामुळे कम्पूटर, मोबाईल आणि स्मार्ट टिव्ही हॅक होऊ शकतो. त्यामुळे वापरणाऱ्यांनी काळजी घ्यावी. हॅक होऊ नये सेटिंगमध्ये बदल करा. जेणेकरून कोणत्याही अनुचित घटनेस सामोरे जावे लागणार नाही.
- डॉ. अर्जून माने
(सायबर एक्सपर्ट) 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your smart tv can be hacked by hackers be carefull