esakal | भारतात लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक स्कुटर Gogoro Visva, जाणून घ्या फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

gogoro electric scooter

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना अनेक दुचाकी कंपन्यांनी आपल्या इतर दुचाकी वाहनांबरोबर इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा बाजारात लॉन्च करणे सुरू केले आहेत.

भारतात लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक स्कुटर Gogoro Visva

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना अनेक दुचाकी कंपन्यांनी आपल्या इतर दुचाकी वाहनांबरोबर इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा (Electric Scooter) बाजारात लॉन्च करणे सुरू केले आहेत. यामुळे, भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कुटर दाखल झाले आहेत, ज्यात कमी बजेटपासून हाय बजेट स्कूटर आहेत. (gogoro will launch electric scooter in india with hero motocorp)

इलेक्ट्रिक टु व्हिलर बाजारात वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येक कंपनी लेटेस्ट तंत्रज्ञानासह जास्तीत जास्त फीचर्स असणारे स्कूटर बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अलीकडेच तैवानच्या इलेक्ट्रिक वाहन बनवणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) सहकार्याने भारतात आपले इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरवात केली आहे. हीरो मोटोकॉर्पने हे इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्यासाठी तैवानची आघाडीची इलेक्ट्रिक टू व्हिलर वाहन बनवणारी कंपनी GOGORO शी करार केला आहे. या स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी बॅटरी वापरली जाईल, जी बदलली जाऊ शकते.

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

मीडिया रिपोर्टनुसार, हे स्कूटर रजिस्टर करण्यासाठी तैवानची कंपनी GOGOROयांनी रजिस्ट्रेशन दाखल केले आहे. ज्यानंतर ते लवकरच कंपनीच्या साइटवर पोस्ट केली जाऊ शकते. या स्कूटरला एक आकर्षक युनिक डिझाईन देण्यात आली आहे. हे स्कूटर भारतात सध्या असलेल्या स्कूटरच्या डिझाईनपेक्षा अगदी वेगळे असणार आहे. जे सिंगल कलर टोनमध्ये लाँच केले जाणार आहे. परंतु कंपनी हे स्कूटर कमीतकमी 6 कलर टोनमध्ये लॉन्च करेल.

या स्कूटरच्या पॉवर आणि रेंजबद्दल सांगायचे तर त्यात कंपनीची 3 किलोवॅटची मोटर देण्यात आहे. या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास घेईल. त्यानंतर, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर, हे स्कूटर 85 किमीची रेंज देईल. ज्यामध्ये आपल्याला ताशी 30 किलोमीटरचा वेग मिळेल. सध्या हे स्कूटर भारतात केव्हा बाजारात येईल याविषयी कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही पण असा विश्वास आहे की हा स्कूटर दिवाळीच्या आसपास भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. स्कूटर रेंज आणि पॉवरनुसार हे 50 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केले जाऊ शकते.

(gogoro will launch electric scooter in india with hero motocorp)

हेही वाचा: वोडाफोन आयडीयाच्या या प्लानवर मिळते Zee5 चं सब्सक्रिप्शन

loading image
go to top