Airtel ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मोबाईल रिचार्ज अन् बिलवर मिळतेय २५ टक्के सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel

Airtel ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मोबाईल रिचार्ज अन् बिलवर मिळतेय २५ टक्के सूट

भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल(Bharti Airtel) आणि एक प्रमुख बँकिग संस्था अ‍ॅक्सिस बँकने मिळून ग्राहकांना एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Co-branded credit cards) लॉन्च केले आहे. नवीन कार्डचे नाव एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडीट कार्ड आणि भारती एअरटेल ३४० मिलीयन ग्राहकांना विशेष फायदा मिळणार आहे. या कार्डामुळे ग्राहकांना कित्येक फायदे होत आहे. जसे की खरेदी केल्यानंतर प्री- अप्रुव्ह इंस्टंट लोन( Pre-approve instant loan), बिल पे केल्यानंतर कॅशबक आणि बरंच काही. एअरटेल ग्राहकांना एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत मिळणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊ या.

हेही वाचा: Photo : 'तुस्सी कमाल कर दित्ता', पंजाबमध्ये छोट्या- मोठ्या केजरीवालांची धूम

Airtel Axis Bank Credit Card चे फायदे

हे आहेत एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना मिळणारे फायदे

  • 1) कोणत्याही एअरटेल डीटीएच या मोबाईल रिचार्ज, एअरटेल एक्सस्ट्राम फायबर किंवा एअरटेल ब्लॅकचे पेमेंट केल्यानंतर २५ टक्के कॅशबॅक

  • २) १० टक्के कॅशबॅक- Zomato, Swiggy, आणि BigBasket वर.

  • ३) एअरटेल थँक्स अ‍ॅपच्या माध्यमातून वीज/पाण्याचे बिल/ गॅस पेमेंटवर १० टक्के कॅश बॅक

  • ४)इतर सर्व खर्चांवर १ टक्के कॅश बॅक

  • ५) त्यासोबतच कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला ५०० रुपयांचे Amazon e-voucher मिळणार आहे जे ३०दिवसांच्या आत वापरू शकता.

हेही वाचा: दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा

एअरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा

सर्व पात्र ग्राहक एअरटेल थँक्स अ‍ॅपच्या माध्यमातून एअरटेलअ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज पाठवू शकतात. भारती एअरटेल आता एकमात्र टेलीकॉम ऑपरेटर आहे जे आपल्या ग्राहकांना को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड देत आहेत. जे ग्राहक एअरटेलशी संबधीत नाही त्यांना कंपनी हे कार्ड मिळू शकत नाही.