IPL पासून ते नीरज चोप्रापर्यंत, हे होते यंदाचे टॉप ट्रेंडीग सर्च

Google 2021 Year in Search
Google 2021 Year in SearchGoogle
Updated on

चालू वर्ष संपत असताना मागील वर्षातील घटनांचे सिंहावलोकन केले जाते. टेक कंपनी Google देखील मागील वर्षभरात सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी जाहिर करते. दरम्यान Google च्या 2021 वर्षाच्या शोध डेटानुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही सलग दुसऱ्या वर्षी भारतातील टॉप ट्रेंडिंग सर्च होता. टेक जायंट कंपनी गुगलकडून प्रत्येक वर्षाच्या शेवटी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये टॉप ट्रेंड जारी केले जातात. 2021 मध्ये, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मॉडेल, अभिनेत्री शहनाज गिल यांना मागे टाकत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा देशातील ट्रेंडिंग व्यक्तिमत्त्वांच्या यादीत टॉपवर आहे.

ट्रेंडिंग विषयांच्या यादीमध्ये क्रीडा क्षेत्राचे मोठे वर्चस्व यंदा पाहायला मिळाले आहे, यात खेळाडू आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. कोरोनाचा फटका बसलेले आणि दोन टप्प्यांत आयोजित केलेली इंडियन प्रीमियर लीग या यादीत पहिल्या स्थानावर राहिली, त्यानंतर कोविन, आयसीसी टी-२० विश्वचषक, युरो कप आणि टोकियो ऑलिम्पिक हे विषय अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले तर कोविड लस हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा ट्रेंडिंग विषय होता, त्यानंतर फ्री फायर रिडीम कोड आणि कोपा अमेरिका यांचा सातवा आणि आठवा नंबर लागतो. तर 2021 मध्ये भारतातील टॉप 10 ट्रेंडिंग सर्चची यादीत नीरज चोप्रा नवव्या आणि आर्यन खान १० व्या क्रमांकासह पुर्ण होते.

टेस्ला कार कंपनीचे मालक एलोन मस्क ट्विटरवरील सर्वात ट्रेंडिंग व्यक्तिमत्त्वांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. मस्क यांचे नाव विकी कौशल आणि पीव्ही सिंधू यांच्यापेक्षा जास्त वेळा सर्च करण्यात आले. मस्क यांनी गेल्या वर्षभरात क्रिप्टोकरन्सी, त्यातही Dogecoin बद्दल केलेल्या ट्विटमुळे बरेच चर्चेत राहिले होते.

Google 2021 Year in Search
जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

Google च्या 'how to' कॅटेगरीमध्ये कोरोना संबंधीत विषयांचे वर्चस्व राहीले आहे. कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी, लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे आणि ऑक्सिजन पातळी कशी वाढवायची हे या विषय टॉप तीन ट्रेंडिंग मध्ये होते. यासोबतच Dogecoin कसे खरेदी करावे हा सर्च सहाव्या स्थानावर आहे. तर Bitcoin मध्ये गुंतवणूक कशी करावी हा नववा सर्वात ट्रेंडिंग विषय होता.

Google 2021 Year in Search ने देखील 2021 मधील सर्वाधिक ट्रेंडिंग चित्रपटांची देखील लिस्ट जाहिर केली आहे. यामध्ये सूर्याचा तमिळ चित्रपट जय भीमने पहिले स्थान पटकावले असून त्यापाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह आणि सलमान खानची राधे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. टोकियो ऑलिम्पिक हा वर्षातील सर्वात ट्रेंडिंग बातम्यांमधील विषय होता, तर ब्लॅक फंगस आणि अफगाणिस्तानमधील बातम्यांनी त्यापुढील क्रमांक पटकावले.

Google 2021 Year in Search
Honda Activa 125 प्रीमियम एडिशन भारतात लाँच; पाहा किंमत-फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com