Google Updated Features : Google कंपनीने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी पाच नवीन फिचर्स लॉंच केले आहेत, ज्यामुळे तुमच्या डिजिटल टेक वापराच्या अनुभवात आणखी चांगली सुधारणा होईल. या नव्या फिचर्समध्ये विशेषत: दृष्टी दुर्बल व्यक्तींना मदत करणारे TalkBack फीचर, संगीत ओळखण्यासाठी एक नवीन टूल, वेबपेजेस वाचून ऐकण्यासाठी एक सुविधा, भूकंपाच्या इशार्यांसाठी एक सिस्टीम, आणि Google Maps Wear OS वॉचवर थेट उपलब्ध होणार आहे.
दृष्टी दुर्बल व्यक्तींना मदत करणारे TalkBack फीचर आता AIच्या मदतीने फोटो आणि इमेजेसचे वर्णन करण्यासही सक्षम झाले आहे. यामुळे व्हिज्युअली इम्पेअर लोकांना आता चित्रांचा अनुभव अधिक समृद्ध होईल.
संगीत ओळखण्यासाठी Google ने 'Circle to Search' नावाचे टूल उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे आता तुम्ही कोणतेही अॅप बदलण्याशिवाय, फक्त होम बटण दाबून गाणे ओळखू शकता.
Google Chrome वर नवीन फिचर अंतर्गत, तुम्ही वेबपेजेस ऐकू शकता, जे विशेषत: मल्टीटास्किंग करताना किंवा वाचनात अडचण असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल.
भूकंपाच्या इशार्यांसाठी Google ने एक नवीन सिस्टीम आणली आहे जी भूकंपाच्या काही सेकंद आधीच तुम्हाला इशारा देईल.
Wear OS वॉचवर आता Google Maps ऑफलाइनही वापरता येणार आहे, ज्यामुळे प्रवास करताना तुम्हाला फोनशिवायच गाईडेंस मिळू शकेल.
हे सर्व फिचर्स अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील, परंतु काही फिचर्सचे फायदे तुमच्या डिव्हाइसच्या उपलब्धतेवर आणि तुमच्या ठिकाणावर अवलंबून असतील.गुगल नेहमीच वापरकऱ्यांच्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. जे खूपच अत्याधुनिक आणि फायदेशीर असतात. आता यावेळीचे गुगलचे हे 5 फीचर्स नक्कीच अँन्ड्रॉईड वापरकर्त्यांच्यासाठी खास ठरणार आहेत. कारण हे फीचर्स दैनंदिन वापरात येणारे फीचर्स आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.