ऍमेझॉन आणि गुगलमध्ये पुन्हा वाद

वृत्तसंस्था
Wednesday, 6 December 2017

ऍमेझॉनने काही दिवसांपूर्वी आपल्या साईटवरून गुगलचे प्रॉडक्ट विकणे बंद केल्यानंतर गुगलनेही जशाच तसे उत्तर म्हणून ऍमेझॉनच्या काही उपकरणांवरून युट्यूबची सेवा काढून घेतली आहे. या प्रकारामुळे या दोन कंपन्यांमधील वाद पुन्हा समोर आला आहे.  

आज गुगलने जारी केलेलेल्या एका पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऍमेझॉनने नुकतेच लाँच केलेल्या स्क्रीन असणाऱ्या स्मार्ट स्पिकर्सवर यापुढे युट्यूबची सेवा वापरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढील 25 दिवसांमध्ये ऍमेझॉनच्या फायर टीव्हीवरही युट्यूबची सेवा बंद करण्यात येणार असल्याचेही कंपनीने सांगितले. 

गुगलच्या या निर्णयाबद्दल बोलताना ऍमेझॉनच्या प्रवक्त्यांनी गुगलचा हा निर्णय निराशाजनक  असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे निवडक उपकरणांवर (स्मार्ट स्पिकर्स वापरणारे) युझर्सला एखादी सेवा वापरण्यापासून थांबवणे योग्य नाही. आम्ही गुगलबरोबर चर्चा करुन लवकरात लवकर या वादावर योग्य तो तोडगा काढू असेही त्यांनी सांगितले.

या दोन कंपन्यांच्या वादावर काय तोडगा निघणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. यामुळे मात्र ग्राहकांना आणि इंटरनेट युझर्सला याचा फटका बसणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google blocks YouTube access from Amazon’s streaming devices